बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. आगामी नाट्य-चित्र
Written By

कृतांत चित्रपट ट्रेलर: धैर्य बाळगावे लागते

विषय कदाचित तोच असेल पण वेगळ्या वाटेवरचा चित्रपट कृतांत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रेनरोज फिल्म्सची निर्मिती असलेल्या 'कृतांत' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाले. ट्रेलरला भरभरून प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे यात संदीप कुलकर्णी वेगळ्याच गेटअपमध्ये दिसत आहे.
 
ट्रेलर बघून सिनेमात काय असेल याची अत्यंत उत्सुकता प्रेक्षकांना निश्चित आहे कारण आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक मनुष्याला कुटुंबासाठी तर सोडा स्वत:साठी देखील वेळ नाही. अशात जेव्हा अंतर्मनात डोकावण्याची वेळ येते तेव्हा काय घडतं हे दर्शवणारा हा सिनेमा असावा.
 
जीवन आणि जगण्याचे तत्त्वज्ञान यांचे समीकरण दर्शवणारा हा सिनेमा मिहीर शाह यांची ही पहिलीच मराठी निर्मिती आहे. दत्ता मोहन भंडारे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. दिग्दर्शनासोबतच कथा, पटकथा आणि संवाद लेखनाची जबाबदारीही  भंडारे यांनी सांभाळली आहे. संदीप कुलकर्णी, सुयोग गोहे, विद्या करंजीकर, सायली पाटील या कलाकारांनी सजलेला चित्रपट नक्कीच काही न काही संदेश देईल असे ट्रेलर बघून जाणवतंय.
 
येत्या १८ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.