शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. कुंभमेळा
Written By
Last Modified: शनिवार, 16 जानेवारी 2021 (18:37 IST)

कोरोना मुळे हरिद्वार कुंभ मेळ्यात जाऊ शकत नाही तर काय करा

प्रयागे माघ पर्यंत त्रिवेणी संगमे शुभे।
निवासः पुण्यशीलानां कल्पवासो हि कश्यते॥- (पद्‌मपुराण)
 
कुंभ मध्ये सगळे जाऊ शकत नाही,पण जाण्याचा विचार करतात. हा काळ दान,जप,ध्यान आणि संयमाचा आहे. अशा परिस्थितीत प्रश्न असा येतो की कुंभ मध्ये न जाता पुण्य कसे मिळवता येईल?
 
सध्या कुंभ मध्ये कल्पवास सुरू आहे. कुंभात स्नान करण्याचे महत्त्व आहे. तसेच कल्पवासात नियम आणि कायदे करण्याचे महत्त्व आहे.कुंभात प्रवचन ऐकून, दान करून आणि पितरांना तर्पण करून देखील लोक पुण्य मिळवतात. आपण देखील दान करून देखील पुण्य मिळवू शकता. 
 
1 दररोज हळदी मिश्रित हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाने स्नान केल्यावर सकाळ-संध्याकाळ संध्या करताना भगवान विष्णूंचे ध्यान करा आणि खालील मंत्राने स्वतःला शुद्ध करा. 

ॐ अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा।
यः स्मरेत पुण्डरीकांक्ष से बाह्याभ्यंतरः शुचि।
 
या मंत्राने आचमन करा -
ॐ केशवायनमः ॐ माधवाय नमः ॐ नाराणाय नमः मंत्राचे जाप करा. 
 
हातात नारळ,फुले आणि द्रव घेऊन हे मंत्र म्हणा नंतर आचमन करीत गणेश,गंगा,यमुना,सरस्वती, त्रिवेणी,माधव,वेणीमाधव आणि अक्षयवटची स्तुती करा.
 
2  जो पर्यंत कुंभ आहे तो पर्यंत दररोज एकाच वेळी साधे जेवण करा आणि मौन बाळगा. 
 
3  दान देताना एकाद्या योग्य व्यक्तीला दान देऊ शकता. दान मध्ये अन्नदान, वस्त्र दान, तुलादान, फलदान,तीळ किंवा तेलदान करू शकता.
 
4 गाय, कुत्रा, पक्षी,कावळा,मुंगी आणि मास्यांना खायला द्यावे. गायीला खाऊ घातल्यानं घरातील वेदना दूर होतात. कुत्र्याला खाऊ घातल्यानं शत्रू आपल्यापासून दूर राहतात. कावळ्याला खाऊ घातल्यानं पितर प्रसन्न होतात. पक्षींना खाऊ घातल्यानं व्यवसायात आणि नोकरीत फायदा होईल. मुंग्यांना खाऊ घातल्यानं कर्ज कमी होतो आणि मास्यांना खाऊ घातल्यानं समृद्धी वाढेल. 
 
5 संकल्प घ्या- 
कोणत्याही प्रकारचे  व्यसन करणार नाही, राग आणि द्वेषबुद्धीने कोणतेही काम करणार नाही, वाईट संगत आणि दुष्कर्माचे त्याग करेन आणि नेहमी आई-वडील आणि गुरूंची सेवा करेन.