1. धर्म
  2. हिंदू
  3. कुंभमेळा
Written By
Last Updated : मंगळवार, 19 जानेवारी 2021 (09:37 IST)

कुंभमेळा 12 वर्षांनी का भरतो

kumbh mela 2021
देशातील चार ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. हरिद्वार, अलाहाबाद, नाशिक आणि उज्जैन या ठिकाणी कुंभमेळा भरतो. प्रत्येक 12 वर्षांत चार ठिकाणी या मेळ्याचे आयोजन होत असल्याने दर तीन वर्षांनी देशातील एका स्थानावर कुंभमेळा आयोजित होतो. यापैकी नाशिक आणि उज्जैनमध्ये एका वर्षांच्या अंतराने कुंभमेळा आयोजित केला जातो.
 
आता प्रश्न येतो की कुंभमेळा 12 वर्षांनी का भरतो तर यामागची पुराणकथा अशी आहे की, जेव्हा देव आणि दानवांनी समुद्र मंथन केले तेव्हा अमृत प्राप्त करण्यासाठी देव आणि दानवांमध्ये युद्ध झाले होते. हे युद्ध सलग 12 दिवस चालले. या युद्धादरम्यान चार ठिकाणी अमृताचे थेंब पडले. हे थेंब पडलेले ठिकाण म्हणजे प्रयाग, ‍हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन. कालगणनेनुसार देवतांचा एक दिवस पृथ्वीवरील एका वर्षासारखा असतो. त्यामुळे दर 12 वर्षांनी या चार ठिकाणी महाकुंभ मेळा आयोजित केला जातो. आणि ज्या ठिकाणी हे थेंब पडले तिथे प्रत्येक 12 वर्षात कुंभमेळा भरतो.