रविवार, 12 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. कुंभमेळा
Written By वेबदुनिया|

कुंभमेळ्याचे मुख्य आकर्षण

WD
कुंभमेळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे शाही स्नान असते. शाही स्नानासाठी लाखोंच्या संख्येने अखाडे, साधु, संत व भाविक निघतात. दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते. कार्यक्रमांच्या माध्यमातून एकात्मतेचे दर्शनही घडून येत असते. त्यातून सात्विक भावनाही प्रगट होतांना दिसतात. वैष्णवी अखाडे हे अठरा अखाड्‍याचे प्रतिनिधित्व करीत आहेत. वैष्णवी अखाड्‍यातील 'महंत्त' ही पदवी प्राप्त करण्‍यासाठी नवोदीत संन्यास्याला अनेक वर्षांची सेवा करावी लागत असते.

वैष्णव अखाड्याची फार प्राचीन परंपरा आहे. नवोदीत साधु संन्यास ग्रहण केल्यानंतर तीन वर्षाची अथक सेवा करतात. तेव्हा त्यांना 'मुरेटिया' ही पदवी मिळते. त्यानंतर संन्यासी 'टहलू' पदास पात्र होत असतो. असे 'टहलू' संन्यासी महंतांची सेवा करतात. अनेक वर्षांची सेवा झाल्यानंतर 'टहलू' यांना 'नागा' ही पदवी मिळत दिली जाते. 'नागा' हे पद सांभाळणार्‍या साधुंवर अखाड्‍या संबंधित महत्त्वपूर्ण जबाबदार्‍या पार पाडाव्या लागतात.

अखाड्या संबंधित महत्त्वपूर्ण जबाबदार्‍या सकुशल सांभळणार्‍या 'नागा' साधूला 'अतीत' ही पदवी म‍िळत असते. 'अतीत'नंतर पुजारी पदासाठी पात्र होत असते. 'पुजारी' झाल्यानंतर एखाद्या मंदिराची जबाबरादी यशस्वी पार पाडल्यानंतर पुढे जावून त्यांना 'महंत' ही पदवी प्राप्त होत असते.

शाही स्नान आटोपन आल्यानंतर साधु मंहत आखाड्याच्या माध्यमातून विविध कलाप्रकार प्रदर्शित करीत असता. ते पाहण्‍यासाठी भाविकांची गर्दी होत असते.

WD
कुंभातील पहिला स्नान 14 जानेवारी रोजी मकरसंक्रांतला सुरू होणार असून 27 जानेवारी 2013 पौष पौर्णिमा, 06 फेब्रुवारी 2013 एकादशी, 10 फेब्रुवारी 2013 मौनी अमावस्या, 15 फेब्रुवारी 2013 वसंत पंचमी, 17 फेब्रुवारी 2013 रथसप्तमी,18 फेब्रुवारी 2013 भीष्म एकादशी, 25 फेब्रुवारी 2013 माघ पौर्णिमा, 10 मार्च 2013 महाशिवरात्री- विशेष शाही स्नानाचे आयोजन करण्‍यात आले आहे. त्यानंतर कुंभमेळ्याचा समारोप केला जातो.