रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: मंगळवार, 19 नोव्हेंबर 2024 (08:46 IST)

छत्रपती संभाजीनगर मध्ये अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्यावर प्राणघातक हल्ला

Chhatrapati Sambhajinagar news: गंगापूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला असून त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.
 
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी थांबला. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या क्षणी उमेदवारांवर हल्ल्याच्या घटना समोर येत असून, त्यामुळे निवडणुकीचे वातावरण तापले आहे.
 
सोमवारी गंगापूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला असून त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना सॊमवारी संध्याकाळी 7.30 वाजता घडली. तसेच सुदैवाने सुरेश सोनवणे यांना फारशी दुखापत झाली नसून, त्यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकही तयार केले आहे.