शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 8 सप्टेंबर 2024 (12:46 IST)

खैके पान बनारस वाला' या गाण्यावर भाजप आमदार प्रशांत बंब थिरकले, व्हिडीओ व्हायरल

prshant bomb
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगानगर मतदार संघातील भाजप आमदार प्रशांत बंब यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भाजपचे आमदार मंचावर खैके पान बनारस वाला' या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. 

प्रशांत बंब हे गंगानगर विधानसभा मतदार संघाचे आमदार असून त्यांनी 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असून काहींनी त्यांच्यावर टीका केली आहे. मराठवाड्यातील काही भागात शेतकऱ्यांची समस्या सोडवण्याऐवजी बंब नाचण्यात व्यस्त असल्याचे म्हणत आहे. 
 
 सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भाजप आमदार प्रशांत बंबा नाचत असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडीओ गुरुवारी रात्री आयोजित एका कार्यक्रमाचा आहे. बंब म्हणाले, दरवर्षी माझ्या कार्यकर्त्यांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यंदा हा कार्यक्रम प्रसिद्ध पर्यटन स्थळ मैह्समाळ येथे आयोजित केला गेला. या कार्यक्रमात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या खाई के पान बनारसवाला या गाण्यावर डान्स केला. त्यात मला काही गैर वाटत नाही असं ते म्हणाले. 
Edited By - Priya Dixit