गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 14 फेब्रुवारी 2024 (09:05 IST)

ब्रेकिंग! दूध पिल्याने तब्बल ९६ विद्यार्थ्यांना विषबाधा, अनेकांची प्रकृती गंभीर

milk
छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तिसगाव आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सकाळचे दूध पिल्याने तब्बल ९६ विद्यार्थांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, खुलताबाद येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं सांगण्यात येत आहे. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.
 
संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील तिसगाव येथील आदिवासी आश्रम शाळेमध्ये ९६  विद्यार्थ्यांना सकाळी दुधातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या विद्यार्थ्यांनावैद्यकीय उपचारासाठी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ आणि ग्रामीण रुग्णालय खुलताबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
 
नेमकं काय घडले?
खुलताबाद तालुक्यातील तिसगाव येथील आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थी हे निवासी शिक्षण घेत असतात. या ठिकाणी विद्यार्थ्यांना निवासासह भोजन आणि शिक्षण अशा सुविधा शासनाच्या वतीने देण्यात येतात. या ठिकाणी अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या 317 असून आज दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी आठ वाजता विद्यार्थ्यांना आश्रम शाळा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध झालेले दूध देण्यात आले होते. हे दूध पिताच विद्यार्थ्यांना मळमळ उलट्या जुलाब यासारख्या त्रास जाणवू लागल्याने काही विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली होती. संबंधित आदिवासी शाळा प्रशासनाने तातडीने 96 विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय खुलताबाद आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ येथे वैद्यकीय उपचारासाठी आणण्यात आले. या ठिकाणी विद्यार्थ्यांना आल्यावर सलाईन देण्यात आली तसेच औषधोपचार सुरू आहेत.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor