शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. महाराष्ट्र अर्थसंकल्प
Written By
Last Updated : सोमवार, 6 मार्च 2023 (11:14 IST)

“तुम्ही पत्रकार नाही, शिवसेनेचे प्रवक्ते आहात”

rane
नारायण राणे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर बुधवारी (१ फेब्रुवारी) सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. मात्र, यावेळी पत्रकारांनी पेट्रोल आणि गॅस सिलिंडर दरवाढीवरून प्रश्न विचारल्यानंतर नारायण राणेंनी पत्रकारांना थेट शिवसेनेचे प्रवक्ते म्हटलं. यानंतर पत्रकार आणि नारायण राणेंमध्ये शाब्दिक बाचाबाची झालेली पाहायला मिळाली.
 
अहमदाबादसाठी तरतूद होते, मात्र मुंबईसाठी तरतूद होत नाही यावर विचारलं असता नारायण राणे म्हणाले, “आम्ही मुंबईसाठी तरतूद करत आहोत आणि करायला लावू. मुंबईला कोणत्याही प्रकल्पासाठी पैसे लागले तर आम्ही ते उपलब्ध करून देऊ. ते आमचं ऐकतील एवढा आम्हाला विश्वास आहे.”
 
“तुम्ही पत्रकार नाही, शिवसेनेचे प्रवक्ते आहात”
सर्व सामान्यांना पेट्रोल, गॅस दरवाढीवर दिलासा मिळण्याची अपेक्षा यावर प्रश्न विचारला असता नारायण राणे म्हणाले, “तुम्ही पत्रकार नाही, तर सोशल वर्कर झाला आहात किंवा शिवसेनेचे प्रवक्ते झाले आहात.” यावर पत्रकारांनी आक्षेप घेतला. तसेच प्रश्न विचारल्याने कोणी प्रवक्ते होत नाही. प्रश्न विचारणं आमचं काम आहे, असं स्पष्टपणे सुनावलं.
Edited by: Ratnadeep Ranshoor