Daily Horoscope
✕

विदर्भातील भटकंती

Updated: गुरूवार, 3 मे 2018 (17:12 IST)
 
प्राणीसंपदा
ताडोबाचे जंगल सर्वाधिक प्रसिद्ध आहे ते रॉयल बेंगॉल टायगर या वाघांच्या प्रजातीसाठी. याशिवाय बिबट्या, रानमांजरी, हरणे, बारहसिंगे, चीतळ, गवे, रानडुक्कर, नीलगाय, रानकोंबड्या, ठिपकेवाली हरणे असे प्राणी आहेत. तर सरपटणाऱ्‍या प्राण्यांमध्ये मगरी, सुसरी, अजगर, इंडियन कोब्रा, घोरपड हे प्रामुख्याने आढळतात. इंडियन स्टार जातीचे कासवही या ठिकाणी आढळते. त्याचबरोबर पाणथळ जागेत वावरणारे आणि जमिनीवर उडणारे सुमारे १९५ विविध जातींच्या पक्षांची नोंद जंगलात करण्यात आली आहे.
 
या जंगलाचे एक वैशिष्ट्य म्हणजे अभयारण्य घोषित झाल्यानंतरही आज इतक्या वर्षांनंतर जंगलाच्या आतील भागात सुमारे ६० गावे आणि पाडे वसलेले असून विविध भटक्या विमुक्त जमातींचे लोक या ठिकाणी आपली संस्कृती जपत आहेत. जंगलाच्या कोर आणि बफर झोनमध्ये केवळ पारंपरिक शेती करणाऱ्‍यांनाच राहण्यास परवानगी आहे. आधुनिक पद्धतींच्या वापराने जंगल धोक्यात यायला नको हाच यामागे उद्देश आहे. येथील स्थानिक लोक मोहाच्या फुलापासून दारु बनवण्याचा उद्यग करतात.
 
सफारींचे नियोजन
सफारी हाच या जंगलसृष्टीच्या स्वर्गासुखाचा मार्ग ! त्यामुळे त्याचे बुकींग पूर्वनियोजितच असावे.
ताडोबाची पहिली सफर प्रातःकाली साडेपाच वाजताच सुरु होते. उन्हाळा आणि हिवाळ्याचा काळ या सफारींसाठी उत्तम ! ताडोबा अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात असल्यामुळे उन्हाळा अत्यंत उकाड्याचा पण तरीही सकाळ सफारीमुळे प्रसन्न होते. बहिरी ससाणा आणि मेन गेटजवळच्या तळ्यातील सुंदर बदके अंतरास सुखावून जातात! अनेकविध पक्षी, रानमांजरे, रानकोंबड्या, हरणे, बारहसिंगे, नीलगायी, हत्ती सारे काही अद्भूत ! मात्र जंगलच्या राजाच्या दर्शनासाठी फार मोठे धैर्य असावे लागते ! पहिल्याच सफारीत ते होईल असे नाही. दुपारच्या वेळेत जंगलच्या नियमांनुसार कोणत्याही पर्यटकाला जंगलात प्रवेश करता येत नाही. साडेतीन ते सायंकाळी सहा वाजेपयर्यंत अशी आणखी एक जंगल सफारी केली जाते. पुन्हा एक अद्भुत सफारी व्याघ्रदर्शनासाठी ! कित्येकदा व्याघ्रराजे हुलकावणी देऊन जवळूनच निघून जातात. अशा क्षणांना चित्रीत करून आठवणीत साठविता यावे यासाठी पर्यटकांनी सुसज्ज कॅमेरा मात्र अवश्य सोबत बाळगावा !
 
निवासाची व्यवस्था
महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाचे जंगल रिसोर्ट (मोहर्ली) हे निवासासाठी उत्तम ठिकाण ! कुटुंब अथवा दोस्तमंडळी एकत्र राहू शकतील अशा हवेशीर आणि सुस्थितीत रूम्स मंडळाच्या जंगल रिसोर्टला उपलब्ध असतात ज्याचे बुकींग मुंबई, नागपूर आणि ईतर विभागीय कार्यालयांमधुन करता येते.
 
भद्रावती
भद्रावती किंवा भांडक नावाने ओळखले जाणारे हे गाव आपल्या ऐतिहासिक स्थापत्य कलेची साक्ष देणारे ! गोंड राजा भांकासिंह यांच्या काळातील भांकागढ म्हणजेच आजही ३ एकरात अस्तित्वात असलेला भद्रावतीचा किल्ला ! या किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर गोंड राजाचे राज चिन्ह कोरलेले आढळते. गोंड, सातवाहन आणि कौशल वंशांची संस्कृती अनुभवलेले हे गाव किल्यासह विशेषत्वाने ओळखले जाते येथील जैन मंदिरासाठी ! स्वच्छ, शांत आणि प्रसन्न असे हे मंदिर पर्यटकांना मनःशांती देऊन जाते. देव देव्हाऱ्यात नाही असे मानणारे आपण मनःशांतीच्या शोधात मात्र अशा स्थळी नक्कीच विसावतो यात शंका नाही !
 
आनंदवन (वरोरा)
इतरांसाठी जगणे म्हणजे काय याची प्रचिती देणारे ठिकाण म्हणजे आनंदवन ! मॅगसेसे पुरस्कार विजेता बाबा आमटे यांनी कुष्टरोग्यांसाठी स्थापलेली ही संस्था केवळ एक संस्था नसुन ते माणुसकी जपणारे आणि ती वृद्धिंगत करणारे जीवंत उदाहरण ! नागपुरहून १०० किमी अंतरावर असलेले आनंदवन केवळ महारोग्यांचे निवासस्थान किंवा इस्पितळ नसून त्यांचे पुनरूत्थान करणारे कुटुंबच जणु ! येथील आगळे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे इथले निवासी नित्योपयोगी आणि आकर्षक सुबक वस्तू तयार करून स्वतःच्या उपजिवीकेसह सकारात्मक कार्यात हातभार लावतात! आमटे कुटुंबाच्या या दिव्यत्वाचे तेज अनुभवावे ते आनंदवनला प्रत्यक्ष भेट देऊनच ! 
 
संकलन : तृप्ती अशोक काळे

सर्व पहा

गरुड पुराणावर आधारित असेल अजय देवगणचा 'सूर्यस्पर्श'; अभिनेता एका अलौकिक अवतारात दिसणार!

चित्रीकरणाच्या ७ दिवस आधी अक्षय खन्ना 'दृश्यम ३' मधून बाहेर पडला, जयदीप अहलावतचा प्रवेश

'जेलर २' मधील विद्या बालनचा धोकादायक लूक समोर आला; अभिनेत्री 'कांता'च्या भूमिकेत रजनीकांतसोबत टक्कर देणार

'हनुमान अंश'च्या प्रचंड कमाईनंतर, डॉ. विशाल चतुर्वेदी यांची मोठी घोषणा: ते 'राम बोला'मधून मिळणारी १००% कमाई दान करणार

अनुभव सिन्हा यांच्या चित्रपटात वहिदा रहमान साकारणार महात्मा गांधींच्या आई पुतलीबाईची भूमिका

सर्व पहा

शाहरुख खानपासून ते आलिया भट्टपर्यंत, अनेक सेलिब्रिटींनी राणी मुखर्जी यांच्या आईच्या अंत्यविधीला उपस्थिती लावली

गरुड पुराणावर आधारित असेल अजय देवगणचा 'सूर्यस्पर्श'; अभिनेता एका अलौकिक अवतारात दिसणार!

राणी मुखर्जी यांच्या आई कृष्णा मुखर्जी यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

शाहरुख खानने पत्नी गौरी आणि मुलगी सुहानासह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले

चित्रीकरणाच्या ७ दिवस आधी अक्षय खन्ना 'दृश्यम ३' मधून बाहेर पडला, जयदीप अहलावतचा प्रवेश

पुढील लेख
Show comments