सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. छत्रपती शिवाजी महाराज
  3. महाराष्ट्रातील किल्ले
Written By
Last Updated : मंगळवार, 14 फेब्रुवारी 2023 (13:44 IST)

रायगड किल्ला

Raigad Fort
महाराष्ट्राच्या इतिहासातील एका युगातील रायगड किल्ला, म्हणजे मराठा साम्राज्याची राजधानी. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक मराठा साम्राज्याचे अधिकृत राजे म्हणून झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच किल्ल्यावर अखेरचा श्वास घेतला. 
 
महाड येथे स्थापित असलेल्या या किल्ल्याला पूर्वी रैरीच्या नावाने ओळखायचे 1656 मध्ये चंद्रराव ने हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांकडून काबीज केले आणि या मध्ये सुधारणा करून ह्याचे नाव रायगड ठेवले. नंतर हाच किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याची राजधानी बनला. याच किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक देखील झाले. 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले देह त्याग देखील इथेच केले.  
 
1689 मध्ये जुल्फिखर खान ने किल्ल्यावर काबीज करून त्याचे नाव बदलून 'इस्लामगड' केले. नंतर 1818 मध्ये ब्रिटिशांनी या किल्ल्याला तोफांचा वापर करून उध्वस्त केले. 

कस जावं-
रायगड येथून टॅक्सी भाडेतत्त्वावर घेऊन किल्ल्याच्या नजीक बिंदू,पाचाड गाव पर्यंत जावे. इथून रोपवे ची सुविधा देखील आहे. या मार्गाने आपण 4 मिनिटातच किल्ल्यात पोहोचता.या रोपवे ची लांबी 750 मीटर आणि उंची 400 मीटर आहे.
 
 प्रेक्षणीय स्थळे-
रायगड किल्ल्यात गंगासागर तलाव आहे.इथे एक प्रसिद्ध भिंत देखील आहे.ह्याला हिरकणी बुरूज किंवा हिरकणी गढी आहे, जी खडकांवर बांधलेली आहे. 
या किल्ल्यात बरीच आकर्षणे आहेत. जसे नगार खाना, मेणा  दरवाजा, टकमकटोक, पालखी दरवाजा,महादरवाजा,खुबलढा,बुरूज,नाना दरवाजा आणि हट्टी तलाव,मशीदमोर्चा,चोरदिंडी, शिरकाई देऊळ,जगदीश्वर मंदिर कुशावर्त तलाव आहे. 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मुख्य बाजारपेठेत उभारले आहे. हा मार्ग जगदीश्वर मंदिराकडे जातो.महाराजांच्या पत्नी आणि त्यांच्या विश्वासू कुत्र्याची वाघ्या ची समाधी,छत्रपती शिवाजी ह्यांच्या मातोश्री राजमाता जिजाबाईंची समाधी पाचाड गावात आहे.   
सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला वगळता त्यांचे राज्याभिषेकाची स्थळे आणि शिव मंदिर, रायगड किल्ल्याचा सर्व भाग अवशेष आहे.आज किल्ल्याच्या अवशेषात सहा कक्ष आहे या मध्ये प्रत्येक खोलीत शौचालय आहे. मुख्य महाल लाकडाचा वापर करून बनविले होते.गढ आणि दरबार हॉल चे अवशेष जे आज देखील पर्यटकांना आकर्षित करतात.