मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019 (16:04 IST)

आदित्य ठाकरे यांच्याविरोधात अभिजीत बिचुकले

बिग बॉस मराठी सिझन दोनचा स्पर्धक अभिजीत बिचुकले शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांच्याविरोधात विधानसभा लढविणार आहे. अभिजीत बिचुकले यांनी वरळी विधानसभेसाठी आपला अर्ज सादर केला आहे. बिचुकले यांनी आजवर साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढवून प्रसिद्धी मिळवली होती. 
 
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अभिजीत बिचुकले यांनी सातारा आणि सांगली मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. ‘महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री मीच होणार’, अशी इच्छा बिचुकले यांनी अनेकदा बोलून दाखवली आहे. यावेळी विधानसभेच्या २८८ जागा लढविण्याची भूमिका त्यांनी काही दिवसांपूर्वी मांडली होती. मात्र आता वेळेअभावी २८८ मतदारसंघात निवडणूक लढविणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.