मंगळवार, 9 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019 (09:54 IST)

रोहित पवार यांच्या विरोधात मनसेने दिला उमेदवार

Maharashtra polls
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तिसरी यादी अधिकृत ट्विटरवर अकाऊंटवर जाहीर करण्यात आली आहे. तिसऱ्या यादीत 32 नावं आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांच्या विरोधातही मनसेने उमेदवार दिला आहे. सोबतच तिसऱ्या यादीत पुणे जिल्ह्यातील जवळपास सगळे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. 
 
मनसेने याआधी दोन याद्या जाहीर केल्या. पहिल्या यादीत 27 जणांची नावं होती. तर दुसऱ्या यादीत 45 जणांचा समावेश होता. आता तिसऱ्या यादीत 32 जणांची नावं आहेत. आत्तापर्यंत मनसेने 104 उमेदवार दिले आहेत. मनसे 100 जागा लढवणार असा अंदाज व्यक्त होत होता. याशिवाय  बाळा नांदगावकर यांचं नाव तिसऱ्या यादीतही देण्यात आलेलं नाही. त्यामुळे कदाचित ते यावेळी विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत असं बोलल जात आहे.