बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019 (09:51 IST)

तीन दिवसातच काय, तीन वर्षात कधीही भेट नाही, खडसे यांचा खुलासा

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून जाहीर करण्यात आलेल्या याद्यांमध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव नाही. यातच राष्ट्रवादी काँग्रचे प्रमुख शरद पवार यांनी देखील खडसे तीन महिन्यांपासून आमच्या संपर्कात असल्याचे सांगितले.  मात्र, यावर  माध्यम प्रतिनिधींशी बोलताना खडसे यांनी खुलासा करत, मी कधीही राष्ट्रवादीच्या  संपर्कात नव्हतो, शरद पवार आणि माझी तीन दिवसातच काय, तर तीन वर्षात कधीही भेट झालेली नाही. अफवांवर विश्वास ठेऊ नका. कार्यकर्ते विचारत आहेत की, तुम्ही काही निर्णय घेतला आहे का? परंतु असा कोणताही निर्णय मी घेतलेला नाही आणि घेण्याची शक्यताही नाही, असे खडसे यांनी स्पष्ट केले आहे.
 
याआधी शरद पवार यांनी ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकार परिषद घेत भाजपाचे अनेक नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला होता.