गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: गुरूवार, 3 ऑक्टोबर 2019 (09:11 IST)

अंडरवर्ल्ड डॉनच्या भावाला भाजपा शिवसेना युतीच्या घटक पक्षाकडून उमेदवारी

शिवसेना-भाजपा महायुतीचा घटक असलेल्या रिपब्लिकन पक्षाला विधानसभा निवडणुकीसाठी सहा जागा मिळाल्या आहेत. रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना चार उमेदवारांची नावे जाहीर केली असून, या सर्उव उमेदवारांमध्ये अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजे यांचाही समावेश केला आहे. रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असणारे दीपक निकाळजे फलटणमधून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दीपक निकाळजे यांना उमेदवारी देण्यावरुन टीका केली आहे. रामदास आठवले यांनी सातारा जिल्ह्यातील फलटण; सोलापुरातील माळशिरस; विदर्भातील भंडारा; मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील नायगाव; परभणी जिल्ह्यातील पाथरी तसेच मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर या ६ जागा रिपाइंला मिळाल्या असे माध्यमांना सांगितले आहे. 
 
रिपाइंच्या उमेदवारांची नावे :-
मानखुर्द शिवाजीनगर – रिपाईचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे
फलटण – दीपक निकाळजे
पाथरी – मोहन फड
नायगाव – राजेश पवार