शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: गुरूवार, 10 ऑक्टोबर 2019 (10:10 IST)

निवडणूक नाही सोप्पी कोठे नातेवाईक विरोधात तर कोठे भाऊ बहिण विरोधात

विधासभा निवडणूक ही अनेक कारणांनी गाजते आहे. यामध्ये तर आता राज्यातील अश्या काही जागा आहेत तेथे उमेदवारांना घरातील उमेदवारा विरुद्ध लढावे लागत आहे. यामध्ये कोठे बहिण भाऊ तर कोठे काका विरुद्ध पुतण्या अश्या लढती होणार आहेत. नात्यागोत्यातही निवडणूक जोरदार  रंगली आहे. राज्यात अशी लक्ष्यवेधी घराणी आहेत, जे एकमेकांविरोधात  प्रचार करत असून वेगळ्या पक्षात लढत आहेत. धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे यांची लढत राज्याला माहीत आहेच, पण अन्य भावंडे, भावकी, नातीगोती रिंगणात आहेत.
 
नातेवाईक vs नातेवाईक लढती पुढील प्रमाणे आहेत 
पहिली लढत अलातूर येथील असून  विद्यमान मंत्री संभाजी पाटील निलंगेकर (भाजप) vs अशोक पाटील निलंगेकर (काँग्रेस) – निलंगा, लातूर (चुलते पुतणे) अस्जी होणार आहे,  दुसरी लढत जयकुमार गोरे (भाजप) vs शेखर गोरे (शिवसेना) – माण, सातारा (सख्खे भाऊ) या दोन भावात होणार आहे, तिसरी लढत  सर्वात चर्चेत आणि पूर्ण राज्याचे लक्ष असलेली  पंकजा मुंडे (भाजप) vs धनंजय मुंडे (राष्ट्रवादी) – परळी, बीड (चुलत भाऊ) यांच्यात होणार आहे.  चौथी लढत  जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) vs संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी) – बीड, बीड (चुलते-पुतणे) याच्यात होत आहे. तर पाचवी लढत ही  इंद्रनील नाईक (भाजप) vs निलय नाईक (राष्ट्रवादी) –  पुसद, यवतमाळ (चुलत भाऊ) या दोघात होणार आहे.