शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: बुधवार, 30 ऑक्टोबर 2019 (15:29 IST)

विधीमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस

विधानसभा निवडणुकीत भाजपला शंभरहून अधिक जागा मिळाल्याअसून तो सर्वात मोठा पक्ष बनला आहे. निवडणूक निकाल लागल्यानंतर आज पहिल्यांदाच भाजपचे सर्व नवनिर्वाचित आमदार विधीमंडळात बैठकीसाठी जमले. भाजपच्या आमदारांनी भगवे फेटे बांधून जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

यावेळी ‘हमारा नेता कैसा हो, देवेंद्र फडणवीस जैसा हो’ अशा घोषणाही दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवन परिसरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक संपन्न झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधीमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची घोषणा केली. त्याला सुधीर मुनगंटीवार यांनी अनुमोदन दिले.