मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शनिवार, 26 ऑक्टोबर 2019 (16:09 IST)

अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांचा भाजपला पाठिंबा

बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भाजपला जाहीर पाठिंबा दिला आहे. राजेंद्र राऊत यांनी शिवसेनेचे उमेदवार दिलीप सोपल यांचा पराभव केला आहे. या भेटीनंतर त्यांनी भाजपाला जाहीर पाठिंबा असल्याचे म्हटलं आहे. युतीमध्ये शिवसेनेला जागा सुटल्याने राऊत यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. भाजपचे बंडखोर राजेंद्र राऊत यांना 95 हजार 482 मतं मिळाली. तर सोपल यांना 92 हजार 406 मतं मिळाली. राजेंद्र राऊत यांचा 3076 मताधिक्यांनी पराभव झाला.
 
राजेंद्र राऊत आणि दिलीप सोपल हे दोघेही पारंपारिक शत्रू आहेत. राजेंद्र राऊत यांनी 2004 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला.  त्यावेळी दिलीप सोपल काँग्रेसमध्ये होते. मात्र 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात पुनर्रचना झाली आणि बार्शी कुरघोड्या पाहायला मिळाली. राजेंद्र राऊत यांनी शिवसेनेला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत राष्ट्रवादीकडे असलेली ही जागा काँग्रेसकडे गेली. त्यामुळे काँग्रेसकडून राजेंद्र राऊत यांनी निवडणूक लढवली. त्यानंतर दिलीप सोपल यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. त्यात सोपल यांचा विजय झाला.