1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शनिवार, 5 ऑक्टोबर 2019 (11:33 IST)

तावडे यांचे बंड नाहीत, पक्ष देणार ती जबाबदारी घेणार अशी भूमिका

आधी देश, मग पक्ष आणि मग आपण या तत्वानुसार आम्ही चालतो. पक्ष दणदणीत मताधिक्याने निवडून येणार. तसेच तिकीट का मिळाले नाही याबद्दल अमित भाई आणि पक्ष श्रेष्ठींशी भविष्यात नक्कीच चर्चा करेन असे स्पष्ट करत विद्यमान उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्याचा पक्षाचा निर्णय शिरसावंद्य मानला आहे.
 
भाजपाने विनोद तावडेंना तिकीट नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर तावडेंनी आपले मत व्यक्त करीत पक्षासोबतच रहाण्याचा निर्णयही घेतला आहे. तावडे हे बोरिवली मतदारसंघामधून आग्रही होते. मात्र त्यांना चौथ्या यादीतही स्थान देण्यात आलेले नाही. भाजपने आज सात उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये बोरिवलीतून विद्यमान आमदार असणाऱ्या विनोद तावडेंऐवजी माजी मंत्री दत्ता राणे यांचे सुपुत्र सुनील राणे यांना तिकीट देण्यात आले आहे. पक्षाचे काम अधिक अधिक चांगल्या पद्धीतीने करण्यावर माझा भर आहे. जे जे काम मला दिले जाईल ते मी करणार आहे,’ असेही तावडेंनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
 
तावडे म्हणाले, मी विरोधीपक्ष नेता होतो. नंतर मी आमदार आहे. आता आमदार नसेल तरी मी समाजहिताचे काम करत राहणार आहे. ‘तिकीट नाकारण्याचे कारण काहीही असेल. त्यांना काही कारण कळले असेल ते खरे असेल खोटे असेल, मला ठाऊक नाही. पण याबद्दल मी नक्की चर्चा करेन. आमच्याकडे अशा चर्चा अनेकदा होत असतात. मी चूक केली असेल तरी पुन्हा मला नक्कीच संधी मिळेल. संघाचा स्वयंसेवक आणि विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून माझ्यावर काही संस्कार आहेत. त्यानुसार मी पक्ष देईल ते काम करेन आणि पक्ष पूर्ण मजबुतीने निवडूण पुन्हा सत्तेत आणेन,’ असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला.