बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Updated : शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019 (10:52 IST)

पुत्र प्रेमापोटी सेनेनं भाजपाला पाठिंबा नाकारला आहे...

गेली १५ ते २० महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलंय. सेनेला मुख्यमंत्री पद हवाय तर भाजप जुन्याच फॉर्मुल्यावर अडून आहे. लोकशाहीत ज्याच्याजवळ बहुमत त्याला महत्व असत त्यानुसारच भाजप जवळ बहुमत नसल तरी १०५ आमदार आहेत. बहुमतासाठी अजून ४० आमदारांची गरज भाजपाला आहे. पण भाजप नैतिकतेच्या आधारावर राज्यपालांच आमंत्रण नाकारलं आहे. कारण जनतेनं महायुतीला सत्ता दिली आहे ना कि एकट्या भाजपाला तेव्हा भाजप सेनेशिवाय सरकार स्थापन करण्यास असमर्थ आहे अन हेच योग्य आहे. पुत्र प्रेमापोटी सेनेनं भाजपाला पाठिंबा नाकारला आहे. येणारा काळ सेनेसाठी अवघड असून जनतेला बहुमत कस सिद्ध करायचं अन मंत्री पदांच वाटप कस होणार.? 
 
राज साहेबांचा मनसे २००९ मध्ये १३ आमदार होते त्यानंतर जनतेनं राज साहेबानं नाकारलं. अन आताही जनतेनं राज साहेबांना नाकारलं आहे.निवडणुकीत खूप भाषण द्यायची अन काम करण्याच्या बाबतीत शून्य. जनतेचं न मनात स्व हा मणी आला कि असच होत . जनतेचा विश्वास संपादन करण तितकच महत्वाचं असत. जनतेत जाऊन काम कारण महत्वाचं असत. नाकी खळखट्याक करण.अन जनतेला पटतील अशा भूमिका हि घेणं महत्वाचं असत. राज साहेबांनी २०१४ मध्ये मोदींना पाठिंबा दिला होता. तर एका बाजूला त्यांच्याच विरोधात उमेदवार उभे केले होते. असे संभ्रमित असलेला पक्ष जनता कधीच स्वीकारत नाही. आपला हेतू जनतेसमोर साफ असायला हवा. आता उद्धव यांच्या हेतू विषयी बघितलं तर सद्य परिस्थिती सेने जी वागत आहे ते संभ्रमित अन स्व , सत्तेच्या लालसा असलेलंच वागत आहे.हिंदुत्वाच्या नावावर पैसे मागायचे अन त्या विरोधातील लोकांना बरोबर जाऊन सत्तेत सहभागी व्हायचं. उद्धव ठाकरे म्हणतात बाळासाहेबांचे स्वप्न सेना पूर्ण करेन. पण बाळासाहेबांचं स्वप्न फक्त मुख्यमंत्री सेनेचा व्हावा हे जरूर होता पण अशा पद्धतीनं तरी नक्कीच नव्हतं.ज्या काँग्रेस राष्ट्रवादीला बाळासाहेबांनी विरोध केला त्यांच्या बरोबर बाळासाहेब तरी नक्कीच जाणार नाही.बाळा साहेबांना अटक करणाऱ्यांना बरोबर सेना सत्तेत बसू पाहत आहे. अन हे बाळासाहेबांनी नक्की स्वीकारलं नसत.बाळासाहेब एक निश्चयी नक्कीच होते अन स्वतः च्या निर्णयांवर नक्कीच ठाम होते.पक्ष सांगेन ते करणारे होते.असो पण भविष्यात बाळासाहेबांचे विचार लोप पावत आहेत का हा प्रश्न पुढे येऊ शकतो कारण सेने तसच वागत आहे.बाळासाहेब मुंडे प्रमोद महाजन असते तर असले पाऊल सेनेनं नक्की उचल नसत.जनतेचा अवमान कधी ह्या तिघांनी केला नसता.जनतेचा अवमान करून अनैतिक सरकार स्थापन होत असेल तर आज बाळासाहेब नक्की दुःखी झाले असते.भाजपने जर चुकीची यात भूमिका असती तर बाळासाहेबांनी जनतेचा पुन्हा कौल मागितला असता अन वेगळं होऊन निवडणुकांना सामोरे गेले असते पण काँग्रस राष्ट्रवादी बरोबर कधीच गेले नसते. असली युती बाळासाहेबांनी लाथाळली असते.

भाजपचं पण काही बाबतीत चुकलंच आहे. असं जरी मान्य केल तरी नियमानुसार राज्यपाल हे ज्या पक्षाचे जास्त आमदार आहेत त्याच पक्षाला सत्ता स्थापनेचा आमंत्रण देतात अन तस आमंत्रण भाजपला आल होत अन भाजपने ते आमंत्रण नाकारून सत्तेपासु दूर राहणेच पसंद केल. एक बाब अशी पण आहे भाजपने मग जनतेचा कौल मान्य केला नाही का तर अस आजीबाबत नाही सेनेशिवाय भाजप सत्तेत राहू शकत नाही कारण जनतेनं तसा कौल दिला आहे.मतदार राज्याच्या विरोधात जाऊ नये असच भाजपाला वाटलं.कारण सत्ता भाजपाला नाही तर महायुतीला दिली आहे अन सत्ता दोघांनीच स्थापन करायची होती. पण सेनेचा बाल हट्ट काही सुटला नाही. मुख्यमंत्री पद साठी सेनेनं भाजपला तर सत्तेपासून दूर ठेवलाच पण जनतेचा कौल हि मान्य केला नाही. ज्याच्या जास्त जागा त्याचाच मुख्यमंत्री असा ठरल असताना अन सेनेला उपमुख्यमंत्री पद अन केंद्रात सत्तेचा वाढीव वाटा तर नक्कीच मिळणार होता पण बाल हट्ट पायी सेनेनं तो नाकारला.भविष्यात महाराष्ट्राची जनता ह्या गोष्टी लक्षात ठेऊनच मतदान करेल. सेनेचा हा दुटप्पी पणा जनता चांगलीच ओळखून आहे. अन भविष्यात जसा मनसे संभ्रम अवस्थेतील पक्ष आहे अन मनसे ला लोकांनी सुरुवातीला स्वीकारलं अन नंतर नाकारलं तसेच सेनेचही होणार आहे .सेना नेहमीच सत्तेत राहून हि विरोधी पक्षात असल्यासारखी वागत होती हे वागणं भाजपने नक्की सहन केल. तेव्हा भविष्यात सेनेचं असल वागणं काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर सत्ता स्थापन केल्यावर काँग्रेस राष्ट्रवादी किती सहन करेल.?हे येणार काळ सांगेल.
 
सेनेच्या मुखपत्रात राऊत नेहमी भाजपवर टीका करत आले आहेत. सत्तेचा पाळणा कसा हालेल असल्या मथळ्याचा अग्रलेख आला होता.सहजच एक मध्यंतरी नाटक बघितलं होत.मुलाला मुलगी बघायला येतात अन मुलाला मुलगी आवडते अन पण मुलीचे बाहेर लफडं असतं. इकडे सार काही आई वडिलांचं ठरत. अन मुलगी काही लग्नाला काही तास बाकी असतात अन तीच ज्याच्या बरोबर लफडं होत त्याच्या बरोबर पळून जाते. इकडे आई वडील चिंतेत अन तिकडे मुलगी  लग्न करून मोकळी अन आनंदात राहते. काही दिवसात तिला मुलगा होतो.
 
आता त्या मुलाची ज्याच्या बरोबर आई वडिलांनि तीच लग्न ठरवलेलं असत अन तिचे आई वडील यांची तिने काळजी केली नसते. आई वडील तिला स्वीकारत नाही अन भविष्यात समाजही तिला स्वीकारत नाही.अन काही दिवसांनी ह्या मुलाजवळील पैसा संपलेला असतो तेव्हा हि मुलगी दुसऱ्याच कुणाच्या तरी शोधात असते. आता हे सार तिच्या नवऱ्याला कळत तेव्हा तोही तिला सोडून देतो. अशी हि मुलगी समाज आई वडील अन आता नवऱ्यापासून हि दूर गेल्यावर पूर्ण पने एकटी असते. तिला आत्महत्येशिवाय पर्याय नसतो. तीच आयुष्य उद्वस्त झालेलं असत. अनैतिकतेच्या आधारावर जागणार्यांचे हाल असेच होतात. तेव्हा सेनेन वेळीच सुधारायला हवं नाही तर सेनेचेही हाल असेच ह्या मुलीसारखे होतील यात शंकाच नाही. निवडणुकीत आरोपप्रत्यारोप झाले ज्यांच्या वर आरोप केले ज्यांच्या विरोधात जनतेनं कौल दिला सत्तेसाठी त्यांना घेऊनच सत्ता स्थापण्यात काय अर्थ ?
 
भाजपला २५ आमदार फोडण काही अवघड नाही पण नैतिकता आडवी येते तेव्हा भाजप असंलं पाऊल उचलूच शकत नाही. कर्नाटक राज्यातील निवडणूक, कुमार स्वामींनी सत्तेसाठी भाजप सोडून काँग्रेस बरोबर गेल्यावर अक्षरश कुमार स्वामींना प्रसार माध्यमांसमोर रडावं लागलं होत. हि गोष्ट सेनेनं विसरता काम नये. नैतिकतेला धरून जे महायुतीच्या बैठकीत सर्वानुमते जे झालं असत ते स्वीकारायला हव होत.
 
- वीरेंद्र सोनवणे