रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शनिवार, 19 ऑक्टोबर 2019 (16:02 IST)

मातोश्रीसमोर जाऊन तोंडं कायमची बंद करेन : नारायण राणे

निवडणूक होऊन जाऊ दे त्यानंतर मातोश्रीसमोर जाऊन तोंडं कायमची बंद करेन असा इशारा नारायण राणेंनी दिला. राणे गप्प बसतील असं कुणाला वाटत असेल तर तसे होणार नाही असंही ते म्हणाले. येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात तिन्ही जागा भाजपाच्या असतील असा विश्वासही नारायण राणेंनी व्यक्त केला आहे. २५ तारखेला उद्धव ठाकरेंचं तोंड बंद करणार अशी टीका भाजपा नेते नारायण राणे यांनी केली आहे. 
 
एवढंच नाही तर मी असा तसा होतो तर मला मुख्यमंत्री का केलं? शाखाप्रमुख, बेस्ट चेअरमन, मंत्री, आमदार ही पदं का दिली? असाही प्रश्न नारायण राणेंनी विचारला. एवढंच नाही तर दीपक केसरकर यांच्यावरही नारायण राणेंनी टीका केली. दीपक केसरकर यांना विकासाची दिशा माहित आहे का? या जिल्ह्याचा पालकमंत्री राज्यात चेष्टा-मस्करीचा विषय झाला आहे. मंत्रिमंडळातील जोकर म्हणजे दीपक केसरकर अशीही टीका नारायण राणेंनी केली.