गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. महाशिवरात्री
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 मार्च 2024 (06:31 IST)

Mahashivratri 2024: महाशिवरात्रीच्या दिवशी या 5 वस्तू घरी आणा, शिवाच्या आशीर्वादाने भराभराटी येईल

Mahashivratri 2024: पंचांगानुसार यावर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 8 मार्च 2024 रोजी शुक्रवारी येत आहे आणि या दिवशी महाशिवरात्री व्रत आहे. हिंदू धर्मात महाशिवरात्रीचे व्रत अत्यंत विशेष आणि महत्त्वाचे मानले जाते. धार्मिक ग्रंथानुसार भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह या दिवशी झाला होता. त्यामुळे भाविक हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात. असे म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले तर ते भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि त्यांच्या जीवनातील अडचणी दूर करतात. या दिवशी लोक भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी उपवास करतात आणि त्यांची विधीपूर्वक पूजा करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची कृपा प्राप्त करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी भोलेनाथांशी संबंधित काही गोष्टी घरी आणल्या गेल्यास ते खूप शुभ असते.
 
नंदी प्रतिमा
महाशिवरात्रीच्या दिवशी घरात नंदी प्रतिमा आणणे शुभ मानले गेले आहे. कारण भगवान शंकराचे वाहन नंदी त्यांना खूप प्रिय आहे. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी नंदीची मूर्ती घरात बसवली तर भोलेनाथ प्रसन्न होतात. नंदीची मूर्ती तिजोरीत ठेवल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
 
रुद्राक्ष
धार्मिक शास्त्रांनुसार रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शिवाच्या अश्रूंपासून झाली आहे आणि ते सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर रुद्राक्ष घरी आणावा. रुद्राक्ष आणून मंत्रोच्चार करून धारण करावे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या तिजोरीत रुद्राक्ष देखील ठेवू शकता. असे करणे शुभ मानले जाते.
 
शिवलिंग
काही मान्यतेनुसार शिवलिंग घरात ठेवू नये. पण पारद किंवा चांदीचे शिवलिंग घरात ठेवता येते. अशा स्थितीत महाशिवरात्रीच्या दिवशी या धातूंनी बनवलेले शिवलिंग आणून त्याची मंदिरात प्रतिष्ठापना करावी आणि त्यानंतर विधीपूर्वक पूजा करावी. असे केल्याने पितृदोष आणि कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते.
 
बेलपत्र
भोलेनाथांना बेलपत्र खूप आवडते हे सर्वांनाच माहित आहे आणि म्हणूनच त्यांच्या पूजेत बेलपत्र नक्कीच अर्पण केले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र घरी आणून शिवलिंगावर हे बेलपत्र अर्पण करणे शुभ असते. यावर भोलेनाथ प्रसन्न होऊन आशीर्वादाचा वर्षाव करतील.
 
महामृत्युंजय यंत्र
धर्म शास्त्राप्रमाणे महामृत्युंजय मंत्रात खूप शक्ती असते. अशात घरात महा​मृत्युंजय यंत्र ठेवणे शुभ मानले गेले आहे. महाशिवरात्रीला महा​मृत्युंजय यंत्र घरात आणणे शुभ ठरते. यादिवशी या यंत्राचे पूजन करुन जातकांना आजार, दोष, भीति आणि आर्थिक संकट यापासून सुटका मिळतो.
 
अस्वीकरण: येथे दिलेली सर्व माहिती सामाजिक आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. यासाठी तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.