गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. महाशिवरात्री
Written By
Last Modified: बुधवार, 10 मार्च 2021 (07:09 IST)

Mahashivratri 11 वस्तू महादेवाला खूप प्रिय, यापैकी एक तरी नक्की अर्पित करा

महादेवाला अती प्रिय 11 वस्तू आहे- जल, बिल्वपत्र, आंकडा, धतूरा, भांग, कापूर, दूध, अक्षता, चंदन, भस्म, रुद्राक्ष .....
 
जल : शिव पुराणात म्हटले आहे की प्रभू शिव स्वयं पाणी आहे. महादेवाला जल अर्पित करण्याचे महत्त्व समुद्र मंथन कथा यात देखील सांगितले आहे. अग्नी समान विष प्यायल्यानंतर महादेवाचा कंठ पूर्णपणे निळा पडला होता. विषाची उष्णता शांत करुन शिवाला शीतलता प्रदान करण्यासाठी सर्व देवी-देवतांनी त्यांना जल अर्पित केले. म्हणून शिव पूजेत पाण्याचे विशेष महत्त्व आहे.
 
बिल्वपत्र :
देवाचे तीन नेत्रांचे प्रतीक आहे बिल्वपत्र. म्हणून तीन पान असणारे बेलपत्र महादेवाला अती प्रिय आहे. प्रभू आशुतोष यांच्या पूजेत अभिषेक व बिल्वपत्र याला प्रथम स्थान प्राप्त आहे. ऋषींप्रमाणे बिल्वपत्र महादेवाला अर्पित करणे आणि 1 कोटी कन्यादान केल्याचे पुण्य एकसमान आहे.
 
आंकडा : शास्त्रांप्रमाणे शिव पूजेत एक आकड्याचं फुल अर्पित करणे सोनं दान करण्यासमक्ष आहे.
 
धतूरा : महादेवाला धतूरा अत्यंत प्रिय आहे. यामागील पुराणात धार्मिक महत्त्व सांगितले असेल तरी याचे वैज्ञानिक आधार देखील आहे. महादेव कैलास पर्वतावर राहत होते. हे अत्यंत थंड क्षेत्र आहे जेथे या प्रकाराच्या आहार आणि औषधींची गरज भासते ज्याने शरीराला उष्णता मिळावी. वैज्ञानिक दृष्ट्या मर्यादित प्रमाणात धतूरा वापरल्याने हे औषधाप्रमाणे कार्य करतं आणि शरीर उष्ण ठेवण्यास मदत करतं. जेव्हाकी धार्मिक दृष्ट्या याचे कारण भागवत पुराणात सांगितले आहे. या पुराणानुसार महादेवाने जेव्हा सागर मंथनातून निघालेल्या विषाचे प्रशान केले तेव्हा ते व्याकुल झाले. तेव्हा अश्विनी कुमारांनी भांग, धतूरा, बेल इतर औषधी देऊन महादेवांची व्याकुलता नाहीशी केली. तेव्हापासूनच महादेवांना भांग धतूरा प्रिय आहे. शिवलिंगावर केवळ धतूरा अर्पित करुन इतिश्री समजू नये, आपल्या मनातील आणि विचारांमधील कडूपणा देखील दूर करावा.
 
भांग : महादेव नेहमी ध्यान करत असतात. भांग सेवन केल्याने ध्यान केंद्रित करण्यास मदत होते. याने ते नेहमी परमानंदात राहतात. समुद्र मंथनातून निघालेल्या विषाचे सेवन महादेवांनी संसारच्या सुरक्षेसाठी आपल्या गळ्यात उतरवले होते. देवाला औषधी स्वरूप भांग देण्यात आली परंतू प्रभूने प्रत्येक कडूपणा आणि नकारात्मकतेला आत्मसात केले म्हणून भांग त्यांना अत्यंत प्रिय आहे. महादेव संसारात व्याप्त वाईटपणा आणि प्रत्येक नकारात्मक वस्तू स्वत:मध्ये ग्रहण करतात आणि भक्तांची विषापासून रक्षा करतात.
 
कापूर : महादेवाचे प्रिय मंत्र आहे- कर्पूरगौरं करूणावतारं.... अर्थात जो कापूरसमान उज्जवल आहे. कापूराचा सुवास वातावरणाला शुद्ध आणि पवित्र करतं आणि महादेवाला हा सुवास प्रिय असल्यामुळे कापूर शिव पूजनात ‍अनिवार्य आहे.
 
दूध: दूधाचे सेवन न करता महादेवाला अर्पित करावे.
 
अक्षता : अक्षत म्हणजे अखंडित. पूजेत अक्षता अर्पित करण्याचे महत्त्व आहे. कोणत्याही पूजेत गुलाल, हळद, अबीर आणि कुंकु अर्पित केल्यावर अक्षता अर्पित कराव्या. अक्षता नसल्यास पूजा पूर्ण मानली जात नाही. पूजेतील काही वस्तू उपलब्ध नसल्यास त्याऐवजी अक्षता अर्पित केल्याचे देखील विधान आहे.
 
चंदन : चंदनाचा संबंध शीतलतेशी आहे. महादेवा मस्तकावर चंदनाचा त्रिपुंड लावतात. चंदन हवनात वापरलं जातं आणि याचा सुवास वातावरणात दरवळतो. शिवाला चंदन अर्पित केल्याने समाजात मान-सन्मान आणि यश वाढतं. 
 
राख : याचा अर्थ पावित्र्यात दडलेला आहे, ते पावित्र्य ज्याला प्रभूने एका मृत व्यक्तीच्या जळत असलेल्या चितामध्ये शोधली आहे. ज्याला आपल्या अंगावर लावून पावित्र्याला सन्मान देतात. असे म्हणतात की भस्म लावून शिव स्वत: मृत आत्म्येशी जुळतात. त्यांच्यानुसार मृतदेहाला जाळल्यावर उरलेल्या राखेत जीवनाचे कोणतेही कण शेष नसतात.त्यात दु:ख, सुख, चांगलं-वाईट काहीच उरत नाही. म्हणून ती राख पवित्र असते, त्यात कोणतेही गुण-अवगुण नसतात, अशी राख अंगाला लावून शिव आपल्या शरीराला सन्मानित करतात. एक कथेनुसार पत्नी सतीने जेव्हा स्वतंला अग्नीला समर्पित केले होते तेव्हा क्रोधित शिवाने त्यांची भस्म आपल्या पत्नीची शेवटची आठवण म्हणून अंगावर लावून घेतली होती ज्याने सती भस्म कणांच्या रुपात नेहमी त्यांच्यासोबत राहावी.
 
रुद्राक्ष : महादेवाने रुद्राक्ष उत्पत्तीची कथा पार्वती देवींना सांगितली होती. एकदा शिवाने एक हजार वर्षापर्यंत समाधी घेतली होती. समाधी पूर्ण झाल्यावर जेव्हा त्याचं मन बाह्य जगात आले तेव्हा जगत कल्याणाची कामान करणार्‍या महादेवांनी आपले डोळे बंद केले आणि तेव्हा त्यांच्या डोळ्यातून पाण्याचे थेंब पृथ्वीवर पडले. त्याहून रुद्राक्षाच्या झाडांची उत्पत्ती झाली आणि महादेवाच्या इच्छेनुसार भक्तांच्या हितासाठी समग्र देशात परसले. त्या वृक्षांवर येणारे फळ हे रुद्राक्ष आहे.