गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. महात्मा गांधी
Written By वेबदुनिया|

गांधीवचने

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात महात्मा गांधी नावाचे एक सोनेरी पानही आहे. आपल्या लढ्याला नैतिकतेची जोड देत या महात्म्याने स्वातंत्र्यलढा नैतिकतेने लढला. म्हणूनच अवघ्या जगाला त्यांची दखल घ्यावी लागली. जगभरातल्या तत्वज्ञनात त्यांचा गांधीवादही समाविष्ट झाला. अनेकांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली. अगदी नेल्सन मंडेलांपासून अमेरिकेचे आताचे अध्यक्ष बराक ओबामा यांचेही गांधीजी हेच प्रेरणास्थान आहे. गांधीजींनी आयुष्यात अनेक विषयांवर महनीय आणि मननीय विचार मांडले. त्यांची विधाने पोकळ नव्हती. त्यात काही विचार होता. म्हणूनच आज जगात ती गांधीजींची वचने म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यातलीच ही काही वचने.... 

जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा.

कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.

माझ्या परवानगीशिवाय. मला कुणीही दुखावू शकत नाही.

इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा. तुमचा 'स्व' तुम्हाला सापडेल.

देवाला कोणताच धर्म नसतो.

आम्ही आमचा स्वाभीमान कुणला दिलाच नाही, तर कुणी तो हिरावून घेऊही शकणार नाही.

रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल, पण ह्रदय हवे. ह्रदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत.

एखादा देश आणि त्याची नैतिक मुल्ये किती महान आहेत, हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात त्यावरूनही कळून येते.

तुम्ही मला कैद करू शकता, माझा छळ करू शकता, माझे शरीर नष्ट करू शकता. पण माझ्या मनाला कैद करू शकणार नाहीत.

या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी आहे, हेही मला मान्य आहे. म्हणूनच फार पूर्वी मी एक निष्कर्ष काढलाय, की सर्वच धर्म सत्य आहेत आणि सर्वांमध्ये काही ना काही चुका आहेत.

तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही. पण तुम्ही काहीच केले नाहीत, तर त्यातून काही निष्पन्नही होणार नाही.

प्रेमाची शिकवण लहान मुलांकडून फार छान शिकता येते.

धीर म्हणजे स्वतःचीच परिक्षा पहाणे.

कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.

चिंतेसारखं स्वतःला जाळणारं दुसरं काहीही नाही. देवावर पूर्ण विश्वास असेल तर कशाबद्दलही आपण चिंता का करतो याचीच लाज वाटली पाहिजे.

बलहीन व्यक्ती कुणालाही क्षमा करू शकत नाही. बलवान माणूसच क्षमा करू शकतो.

अहिंसा हे बलवानांचे शस्त्र आहे.

'डोळ्याच्या बदल्यात डोळा' या तत्वज्ञानाने जग तेवढे आंधळे होईल.

माझ्यातल्या उणीवा आणि माझं अपयश हे माझं यश आणि माझ्या बुद्धिमत्तेसारखंच देवाकडून मिळालं आहे. मी या दोन्ही गोष्टी देवाच्या पायी वहातो.