गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By

Makar Sankranti 2024 Til Upay तिळाचे उपाय आयुष्य सुखमय करतील

या वेळस १५ जानेवारी २०२४, सोमवार या दिवशी मकरसंक्रांतीचे पर्व साजरे केले जाणार आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी तीळ गूळ आणि खिचडीचे खूप महत्त्व असते. याचबरोबर सूर्याला अर्घ्य देणे व श्री हरी विष्णु यांची पूजा करण्याचे खास महत्व आहे 
चला जाणून घेऊया मकरसंक्रांतीच्या दिवशी तिळाचे सहा उपाय करुन आपले जीवन सुखमय कसे करायचे.
 
तिळाचे उपाय : विष्णु धर्मसूत्रात सांगितले आहे की पितरांच्या आत्माच्या शांतीसाठी तसेच सर्व कल्याणासाठी तिळाचे 6 प्रयोग पुण्यदायक आणि फलदायक आहे. 
 
चला जाणून घेऊ या ६ प्रयोग आणि १० सोप्या उपायांबद्दल- 
१. तीळ दान करणे 
२. अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून आंघोळ करणे
३. तीळ वापरुन जेवण 
४. जल मध्ये तीळ अर्पण करणे
५. तिळाची आहुती देणे 
६. तिळाचे उटणे लावणे
 
तसेच हे १० उपाय करून बघितल्यास भाग्य निश्चित चमकेल
१. संक्रांतीच्या दिवशी काळ्या तिळाचे, मीठ, गूळ, काले तीळ, फळ, खिचडी आणि हिरव्या भाजीचे दान करणे हे शुभ मानले आहे. या दिवशी तीळ, गूळ, रेवडीचे दान केले जाते.
२. काले तीळ आणि गूळ याचे दान केल्याने सूर्य देव आणि शनि देव यांची कॄपा होते. 
३. काले तीळ आणि गूळाचे लाडू बनवून खाल्ल्याने घरात सुख आणि समृद्धी येते. 
४. मकरसंक्रांतीच्या दिवशी एक मुट्ठी काळे तीळ घेऊन घरातील सर्वांच्या डोक्यावरून सात वेळेस ओवाळून उत्तर दिशेला टाकून दिल्याने घरात धन आणि बरकत राहते.
५. या दिवशी पाण्यात तीळ टाकून आंघोळ करणे शुभ असते. या दिवशी तिळाचे उटणे लावल्याने वाईट नजर पासून आपले रक्षण होते. 
६. या दिवशी तिळाची आहुती दिल्याने शुभ फल प्राप्त होते. 
७. या दिवशी पितरांच्या शांतीसाठी तीळयुक्त जल अर्पण केल्यान घराला व घरातील सदस्यांना आरोग्य, सुख, समृद्धी प्राप्त होते.
८. या दिवशी मोहरीच्या तेलात तीळ मिसळून एका लोखंडी वाटीत भरून त्याचा दिवा लावून तो दिवा शनि मंदिरात ठेऊन आल्यास शनिदेवांची विशेष कृपा होते.
९. एक स्वच्छ लोट्यात पाणी भरून त्यात थोडे काले तीळ टाकून ॐ नमः शिवाय चा मंत्र म्हणून शिवलिंगावर अर्पण केल्याने शुभ परिणामाची प्राप्ती होते व सर्व रोग दूर होतील. 
१०. या दिवशी तीळ टाकून पाणी सूर्यदेवांना अर्पण केल्याने त्यांची कृपा होते व तसेच मनोकामना पूर्ण होते. तसेच संक्रांतीच्या खास दिवशी तिळाचे हे खास उपाय केल्याने आनंद आणि सुखसंपन्नता येते.