गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. मकरसंक्रांत
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (08:47 IST)

मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा Makar Sankranti Chya Hardik Shubhechha in Marathi

मधुर वाणीचा, 
रंग उडत्या पतंगाचा, 
बंध दाटत्या नात्यांचा, 
आणि शुभेच्छा आपल्याला संक्रांतीच्या.
 
गोड गुळात एकत्र होईल तीळ, 
उडेल पतंग आणि खुलेल मन, 
प्रत्येक दिन असेल सुखाचा आणि प्रत्येक क्षण शांतीचा. 
तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
 
तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यात 
तीळ आणि गुळाप्रमाणे गोडवा येऊ दे. 
मकर संक्रांत तुम्हाला लाभू दे हीच सदिच्छा
 
गोड मित्रा चल उगवला आहे दिनकर
चल एकत्र भेटून उडवूया पतंग मिळून 
आकाशात भरारी घेऊया, संक्रांतीच्या शुभेच्छा लुटूया
 
हृदयातील कटूता सगळी विसरुनी 
तीळगुळाचा गोडवा यावा, 
दुःखे हरावी सारी अन 
आयुष्य सुखाचा सोहळा व्हावा.
 
गूळ आणि तीळाचा गोडवा, 
आकाशात उडणारे उंच उंच पतंग, 
या मकर संक्रांतीला तुमच्या जीवनात येवो आनंदाचे तरंग… 
 
गुळपोळी खाऊ आणि जाडजूड होऊ…
मकर संक्रांतीच्या भरभरून शुभेच्छा.
 
रंगीबेरंगी पतंगांसोबत मन ही झालं बाजिंद
आज संक्रातीचा सण चला करूया साजिरं 
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 
 
नात्यांमध्ये येईल उब, 
आयुष्यात येवो गूळाचा गोडवा, 
मकर संक्रांतीच्या तुम्हा आम्हा सर्वांना शुभेच्छा.