मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. क्रिकेट मराठी
  3. वर्ल्डकप मॅन ऑफ द मॅच
Written By
Last Updated : शुक्रवार, 23 जानेवारी 2015 (13:49 IST)

2003 विश्वकपचे मॅन ऑफ द मॅच

2003 : रिकी पाँटिंग (नाबाद 140 धावा) रिकी पाँटिंगने 2003च्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये कप्तानी डाव खेळला आणि फायनलमध्ये  भारतच्या विरुद्ध नाबाद 140 धावा काढून ऑस्ट्रेलियाला लागोपाठ दुसर्‍यांदा विश्व चॅम्पियन बनवले. फायनलमध्ये त्याने शानदार शतकाचा  पुरस्कार 'मॅन ऑफ द मॅच'च्या रूपात मिळाला.  

19 डिसेंबर 1974मध्ये जन्माला आला पाँटिंग क्लाइव लॉयड नंतर जगातील असा दुसरा कर्णधार आहे, ज्याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने लागोपाठ दोन वर्ल्ड कप (2003, 2007) मध्ये चॅम्पियन बनला. पाँटिंगचा कमाल होता की ऑस्ट्रेलियाई क्रिकेटने टेस्टमध्ये 2004 ते  2011पर्यंत वनडे क्रिकेटमध्ये 2002 ते 2011 पर्यंत स्वर्णकाल बघितला.  

पाँटिंगने पहिला टेस्ट मॅच 8 डिसेंबर 1995ला श्रीलंकेच्या विरुद्ध आणि शेवटचा टेस्ट 3 डिसेंबर 2012मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध खेळला.  या प्रकारे त्याने पहिला वनडे मॅच 15 फेब्रुवारी 1995च्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध आणि अंतिम वनडे 19 फेब्रुवारी 2012ला खेळला. पाँटिंगने 168 टेस्ट सामन्यात 13 हजार 378 धावा काढल्या, ज्यात 41 शतक आणि 62 अर्धशतक सामील आहे. टेस्टमध्ये त्याचा उच्चतम स्कोर 257 रन होता. रिकीने 375 वनडे सामन्यात 13 हजार 704 धावा काढल्या, ज्यात 30 शतक आणि 82 अर्धशतक सामील आहे.  
वनडेमध्ये त्याचा उच्चतम स्कोर 164 धावा होत्या.