1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. कृषीविश्व
  4. Coconut Cultivation Information

शहाळ्याच्या पाण्यापासून ते खोबऱ्यापर्यंत: नारळ शेतीतून कसे मिळवावे शाश्वत उत्पन्न?

नारळ हे बहुवार्षिक पीक असून योग्य नियोजन व व्यवस्थापनाने यातून दीर्घकाळ चांगले उत्पन्न मिळते.

१. हवामान व जमीन
हवामान: उष्ण व दमट हवामान (२०°C ते ३२°C तापमान) उपयुक्त ठरते.
जमीन: उत्तम निचरा होणारी, खोल, रेताड किंवा गाळाची जमीन नारळ शेतीसाठी सर्वोत्तम मानली जाते. जमिनीचा सामू (pH) ५.५ ते ८.० दरम्यान असावा.

२. प्रमुख जाती
उंच जाती: बाणवली, प्रताप, वेस्ट कोस्ट टॉल (WCT). हे झाड आयुष्यमानाने जास्त (६०-८० वर्षे) असते व ते ७ ते ८ वर्षांत फळे देण्यास सुरुवात करते.

ठेंगण्या जाती : चोघट ऑरेंज ड्वार्फ, मलयन यलो ड्वार्फ. ही झाडे ३ ते ४ वर्षांत फळे देतात; मुख्यतः शहाळ्याच्या पाण्याकरिता ही वापरली जातात.

संकरित जाती: D x T किंवा T x D (उदा. गोदावरी गंगा, केरा संकरा). ही लवकर फळे देतात आणि उत्पादकता अधिक असते.

३. लागवड पद्धत
खड्ड्यांचा आकार: १ मीटर × १ मीटर × १ मीटर आकाराचे खड्डे उन्हाळ्यात खणावेत.

अंतर:
उंच जातींसाठी: ७.५ मीटर × ७.५ मीटर
ठेंगण्या जातींसाठी: ६.५ मीटर × ६.५ मीटर

खड्डे भरणे: खड्ड्यांत उत्तम शेणखत, वरची सुपीक माती, २ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ५० ग्रॅम लिंडेन पावडर (वाळवी नियंत्रणासाठी) मिसळून खड्डा भरावा.

४. खत व पाणी व्यवस्थापन
पाणी: झाडाच्या पहिल्या ३ वर्षांत नियमित पाणी देणे आवश्यक आहे. ठिबक सिंचन (Drip Irrigation) सर्वोत्तम पर्याय आहे.

खत मात्रा (प्रति झाड दरवर्षी):
शेणखत / कंपोस्ट: ५० किलो
नत्र (N): ५०० ग्रॅम (१.१ किलो युरिया)
स्फुरद (P): ३२० ग्रॅम (२ किलो सिंगल सुपर फॉस्फेट)
पालाश (K): १२-०० ग्रॅम (२ किलो म्युरेट ऑफ पोटॅश)
५. आंतरपिके
नारळाच्या बागेत पहिल्या ६ ते ८ वर्षांत सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळत असल्याने केळी, अननस, आले, हळद, मिरी किंवा मसाला पिके आंतरपिक म्हणून घेऊन अतिरिक्त उत्पन्न मिळवता येते.

६. किडी व रोग नियंत्रण
भुंगा: नियंत्रणासाठी बागेची स्वच्छता ठेवावी आणि एरंडीच्या पेंडीचे सापळे वापरावेत.
तांबडा किडा : झाडाला पडलेल्या छिद्रांवर योग्य कीटकनाशकांची फवारणी करावी.
कोळी : नारळाच्या कळीवर लिंबोळी तेलाची किंवा शिफारशीत कीटकनाशकांची फवारणी करावी.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
LIVE: सणासुदीच्या तोंडावर मोठा धक्का, मुंबईत म्हशीच्या दुधाच्या दरात ९ रुपयांची वाढ