कांद्याच्या दरात घसरण
कांद्याची किमत घसरल्यामुळे शेतकर्यांचा डोळ्यात पाणी येण्याची वेळ आली आहे. राज्यातील शेतकर्यांना आधीच वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं अशात त्यांच्या शेतमालाला दर मिळत नसल्याने त्याच्यांवर दुहेर संकट दिसून येत आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे क्षेत्र असलं तरी सध्या या कांद्याला दर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. उन्हाळी कांदा काढणीला सध्या वेग आला आहे पण अपेक्षित उत्पन्नात निम्म्याने घट झाली आहे. अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्यानं शेतकर्यांचा खर्च देखील निघणार नाही असे चित्र दिसून येत आहे.
सुरुवातीच्या कांद्याला 1200 ते 1400 रुपयांचा जागेवर भाव मिळाला. मात्र, सध्या कांद्याला 700 ते 800 रुपये भाव मिळत आहे. तसेच अजूनही बराच कांदा काढणीचा बाकी असून एप्रिल महिन्यात सर्व शेतकर्यांचा कांदा काढून होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशात मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आल्यावर भावात अजून मोठी घसरण होण्याची शक्यता आहे.
लहरी वातावरणामुळं यंदा कांदा पिकाच्या उत्पन्नात निम्यानं घट झाली असून खर्च देखील निघणार नाही असे चित्र आहे.