संबंधित माहिती
- कमी खर्चात आणि कमी कालावधीत बंपर उत्पन्न! गाजराची यशस्वी लागवड माहिती
- कमी दिवसांत भरपूर नफा मिळवून देणारे नगदी पीक - फुलकोबी लागवड!
- ३ ते ४ वर्षे सातत्याने उत्पादन शेती; तोंडली लागवडीची संपूर्ण माहिती
- योग्य नियोजन आणि आधुनिक पद्धतीचा वापर; पत्ताकोबी लागवडीची संपूर्ण माहिती
- मेथी कमी कालावधीत आणि कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारे पीक
कमी खर्चात आणि कमी दिवसांत हमखास नफा देणारे पीक - मटार!
मटार लागवड हा कमी कालावधीत आणि कमी खर्चात शेतकऱ्यांना हमखास नफा मिळवून देणारा एक उत्तम कोरडवाहू व बागायती व्यवसाय आहे. मटारच्या पिका मुळे जमिनीचा सुपीकपणा (नत्र स्थिरीकरण) वाढण्यासही मदत होते. मटारची यशस्वी लागवड करण्यासाठी खालील माहिती उपयुक्त ठरेल
हवामान आणि जमीन
हवामान: मटार हे प्रामुख्याने थंड आणि कोरड्या हवामानातील पीक आहे. बियांच्या उगवणीसाठी २२°C आणि पिकाच्या उत्तम वाढीसाठी १५°C ते १८°C तापमान आदर्श मानले जाते. जास्त उष्णतेमुळे फुलगळ होते.
जमीन: मध्यम ते भारी, उत्तम निचरा होणारी आणि सुपीक जमीन योग्य ठरते. जमिनीचा सामू (pH) ६ ते ७.५ च्या दरम्यान असावा.
लागवडीचा हंगाम
रब्बी हंगाम (सर्वोत्तम): १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर हा काळ मटार लागवडीसाठी अत्यंत योग्य आहे.
खरीप हंगाम: डोंगराळ किंवा कमी तापमानाच्या भागात जून-जुलैमध्येही लागवड केली जाते.
सुधारित जाती
लवकर येणाऱ्या जाती (६० दिवसांत): असौजी, अर्केल (Arkel), मटार अगेता.
मध्यम कालावधीत येणाऱ्या जाती (७५-८० दिवसांत): बोनव्हिला, जवाहर मटार-१, आझाद मटार-१.
लागवड पद्धत
पूर्वमशागत: जमीन १-२ वेळा चांगली नांगरून भुसभुशीत करावी. हेक्टरी १० ते १५ टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.
बियांचे प्रमाण: लवकर येणाऱ्या जातींसाठी हेक्टरी ८० ते १०० किलो आणि उशिरा येणाऱ्या जातींसाठी ६० ते ७० किलो बियाणे लागते.
बीजप्रक्रिया: पेरणीपूर्वी बियाणास रायझोबियम (२५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे) आणि बुरशीनाशकाची प्रक्रिया नक्की करावी.
अंतर: दोन ओळीत ३० सेमी आणि दोन रोपांत ५ ते १० सेमी अंतर ठेवून सपाट वाफ्यात किंवा सरी-वरंब्यावर पेरणी करावी.
खत आणि पाणी व्यवस्थापन
खत व्यवस्थापन: मटार हे शेंगावर्गीय पीक असल्याने याला नत्राची गरज कमी असते. पेरणीच्या वेळी २० ते ३० किलो नत्र, ६० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे.
पाणी व्यवस्थापन: पेरणीनंतर लगेच पहिले हलके पाणी द्यावे. त्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. फुलकळ्या निघताना आणि शेंगा भरताना पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये.
काढणी आणि उत्पादन
काढणी: शेंगांचा रंग गडद हिरवा असताना आणि दाणे मऊ व पूर्ण भरलेले असतानाच हाताने तोडणी करावी. शेंगा जास्त जून झाल्यास चव खराब होते.
उत्पादन: हिरव्या शेंगांचे सरासरी उत्पादन प्रति हेक्टरी ७ ते १० टन मिळते.
Edited By- Dhanashri Naik