1. धर्म
  2. हिंदू
  3. मंगळ देव
Written By

अनेक भाविकांना मंगळग्रह देवतेचे दर्शन घेण्यासाठी पाठविले, अयोध्येतील पुरोहित

Mangal Graha Devta
विवाहासह ऋणमुक्ती व पारिवारिक समस्यांतून मार्ग निघावा व आपणावर मंगळग्रह देवतेची सदैव कृपा राहावी, याकरिता भाविक-भक्तांकडून मंगळग्रह देवतेची आराधना केली जाते. मात्र मंदिर कुठे आहे? आणि कसे जावे याविषयीची माहिती नव्हती. भाविकांच्या समस्या सोडविण्यासाठी 'गुगल'ची मदत घेतली आणि अमळनेर येथील मंगळग्रह मंदिराची माहिती आली. आजवर अनेक भाविक-भक्तांना मंगळग्रह देवतेचे दर्शन घेण्यासाठी पाठविले आणि त्यांचे प्रश्नही मार्गी लागले. वर्षभरानंतर का होईना 'गुगल'च्या मदतीने आज मंगळग्रह देवतेचे दर्शन घडले, अशी भावना अयोध्या येथील ज्येष्ठ पुरोहित आचार्य कैलासनाथ तिवारी यांनी व्यक्त केले.
 
अमळनेर येथील अतिप्राचीन, अतिदुर्मिळ व अतिजागृत असलेल्या मंगळग्रह देवतेच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात. मंगळवारी अयोध्या येथील आचार्य कैलासनाथ तिवारी, पुरोहित शिवम दुबेरे, चंद्रमनी सुकलाल यांनी मंगळग्रह देवतेचे दर्शन घेतले. यावेळी आचार्य तिवारी म्हणाले, की अहमदाबाद, सुरत, उत्तर प्रदेश, सुलतानपूर, प्रतापगड, अयोध्या या ठिकाणांहून आलेल्या भाविकांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, यासाठी 'गुगल'वर महिती घेऊन अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात त्यांना पाठविले होते. दर्शन, अभिषेक केल्यानंतर मनोकामना पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आम्हालाही अमळनेर येथील अतिप्राचीन व जागृतस्थळाला भेट देण्याची इच्छा होती. त्यासाठी वेळ काढून आज आलो. मंदिराचे सचिव सुरेश बाविस्कर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष एस. एन.पाटील, विश्वस्त अनिल अहिरराव, खजिनदार गिरीश कुलकर्णी उपस्थित होते.