1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: मंगळवार, 14 मे 2024 (21:01 IST)

मनोज जरांगे पाटील पुन्हा करणार उपोषण, तारीख जाहीर केली

manoj jarange
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण करण्याचे जाहीर केले असून ज्या दिवशी मतमोजणी होणार त्याच दिवशी ते पुन्हा उपोषण करणार आहे. आज मनोज जरांगे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंतीच्या निमित्ताने ते संभाजी नगर येथे संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आले होते. या वेळी ते म्हणाले, आम्ही भाजपविरोधी नाही पण सगे सोयरे ओबीसी मराठा एकच असल्याचा अध्यादेश काढला नाही तर आंम्ही येणारी विधानसभा निवडणूक लढवणार. 

मनोज जरांगे पाटील 4 जून पासून उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. जरांगे पाटील येत्या 8 जून ला नारायण गड येथे मराठा समाजाची विराट सभा घेणार असून त्यापूर्वी ते सभास्थळाची पाहणी करायला जाणार आहे. या लोकसभा निवडणुकीत आम्ही कोणालाच पाठिंबा दिला नाही. तसेच त्यांनी राज्य सरकारने विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे.      
 
Edited by - Priya Dixit