1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 जानेवारी 2017 (10:54 IST)

जानेवारीचा ३१ तारखेला एक मराठा लाख मराठा

Maratha Aarakshan
राज्यभरातून मराठा समाजाच्या  या मराठा मोर्चाचे वादळ मुंबईत 31 जानेवारीला धडकणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्या करण्यात येणार आहेत.मराठा समाजाच्या वतीने राज्यभरात विविध मागण्यांसाठी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावे,  मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यांसारख्या विविध मागण्यांसाठी मूक मोर्चा काढण्यात आला होता. आता मराठा समाजाचा हा मोर्चा मुंबईत धडकणार आहे. मुंबईतील हा मोर्चा मरीन ड्राइव्ह ते आझाद मैदान येथून काढण्यात येणार आहे. त्यामुळे आता सरकार आणि इतर सर्व पक्ष याकडे लक्ष ठेवून आहेत.