शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: सोमवार, 30 नोव्हेंबर 2020 (17:04 IST)

मराठा आरक्षण, छत्रपती संभाजीराजे भोसले मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले येत्या 2 डिसेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी ही भेट असल्याचे सांगितले जात आहे. 
 
यावेळी काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाणही उपस्थित असणार आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्या पार्श्वभूमीव खासदार संभाजीराजे उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे. ही भेट नेमकी कुठे होईल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली आहे. 
 
सर्वोच्च न्यायालयात 9 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती. नोकरी आणि शैक्षणिक आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे राज्यातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत.
 
सर्वोच्च न्यायालयानं एसईबीसी आरक्षणास अंतरिम स्थगिती दिलेली असून, 2020-21 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशाच्या कार्यवाहीबाबत महाधिवक्ता, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेला कायदेशीर अभिप्राय विचारात घेतल्यानंतर सर्व प्रवेश सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं ही ठाकरे सरकारनं स्पष्ट केले होतं.