मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: गुरूवार, 17 सप्टेंबर 2020 (16:18 IST)

तुम्हाला मराठा समाजाला चिथावणी द्यायची आहे का?, संभाजी राजे यांचा सवाल

राज्यात पोलीस शिपाई पदासाठी मोठी भरती होणार आहे. तब्बल 12 हजार 528 पदांसाठी पोलीस भरती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. परंतु या निर्णयावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “तुम्हाला मराठा समाजाला चिथावणी द्यायची आहे का?” असा सवाल विचारत मराठा आरक्षणावर तोडगा निघेपर्यंत पोलीस भरती घेऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.
 
नोकरभरती पुढच्या टप्प्यात करा ना, आजच का घ्यायचीय? तुम्हाला मराठा समाजाला चिथावणी द्यायचीय का? मराठा आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत पोलीस भरती करु नका. बाकीच्या समाजाचे लोक समजून घेतील. समाजातील लोकांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. आता पोलीस भरती घेणं म्हणजे मराठा समाजाला चिथावणी देण्यासारखं आहे असं ते म्हणाले.