मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 मार्च 2021 (16:04 IST)

सरकारने तुझं माझं करण्यापेक्षा मराठा आरक्षण प्रश्न सोडवावा : संभाजीराजे

मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारच्या भूमिकेत सुरूवातीपासूनच समन्वय नव्हता. वेळोवेळी सरकारची भूमिका बदलत गेली? काही ठोस नियोजन आहे की नाही? हे मला सरकारला विचारायचं आहे. असं संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारपरिषदेत म्हटलं. यावेळी त्यांनी सरकारने तुझं माझं करण्यापेक्षा मराठा आरक्षण प्रश्न सोडवावा, असं देखील बोलून दाखवलं.
 
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, मराठा समजाच्या आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा ऐरणीवर आली आहे. उच्च न्यायालायने मराठा समाजाला सामाजिक मागास असं सिद्ध केल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने याला स्थगिती दिली होती. आता १५ ते २५ मार्चला अंतिम सुनावणी होणार आहे. मी काही या वर्षीच आरक्षणाचा मुद्दा घेऊन समोर आलेलो नाही. २००७ पासून मी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. २०१३ ला आझाद मैदानात माझ्या नेतृत्वात मोर्चा काढला होता. तेव्हा नारायण राणे समितीने दिलेलं आरक्षण टिकलं नाही. त्यानंतर २०१७ ला देखील मुंबईत जो महामोर्चा निघाला होता, तेव्हा मला व्यासपीठावर जावं लागलं होतं. तेव्हा मोर्चाला काहीतरी गालबोट लागू शकतं म्हणून मला आलेल्या लोकांना परत जाण्यास सांगावं लागलं होतं. पण, सरकारच्या भूमिकेत सुरूवातीपासूनच समन्वय नव्हता. वेळोवेळी सरकारची भूमिका बदलत गेली? काही ठोस नियोजन आहे की नाही? हे मला सरकारला विचारायचं आहे.