1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
  4. Chile Maharaj Aarti Lyrics in Marathi

चिले महाराजांची आरती

।। आरती चिले महाराजांची ।।
ॐ जय गुरुदेव चिले, ॐ जय गुरुदेव चिले
करीं धरिता पंचारती, नित आनंद मिळे ।।धृ।।
 
हासत खेळत बोलत, तव सावळी मूर्ती
गुरु तव सावळी मूर्ती
भक्तजनांशी कीर्ति, गुरुसेवेत कळे ।।ॐ ।।१।।
 
लाभे सुख हरे दु:ख हसमुख, मम नयना पुढती
गुरु मम नयनां पुढती दत्त दिगंबर विभूती,
आज साकार डुले ।।ॐ ।।२।।
 
परिवार संसार शिरी भार,
जीव हा प्रपंचात गुरु जीव हा प्रपंचात
गुरु पुढती दिनरात, दो कर हे जुळले ।।ॐ ।।३।।
 
कधी गिरी मंदिरी रमे हरि, कधी पैजारवाडी
गुरु कधी पैजारवाडी
परि नरसोबावाडी, दत्तचि अवतरले ।। ॐ ।।४।।
 
कधी वाई टेंबलाई बाबवई, कधी गड पन्हाळा
गुरु कधी गड पन्हाळा भैरव गिरिवर पूजिला,
भक्त तिथे रमले ।।ॐ ।।५।।
 
निशिदिन तंव गुण गाई मन, तू मम करुणेश्वर
गुरु तू मम करुणेश्वर
अर्पण तंव चरणावर मधुगंधाची फुले ।।६।।
About Writer
वेबदुनिया धर्म टीम
वेबदुनिया धर्म टीम विविध धर्मांतील सण-उत्सव, परंपरा आणि अध्यात्मावर आधारित सखोल माहिती वाचकांपर्यंत पोहोचवते. दैनंदिन पंचांग, राशीभविष्य आणि तीर्थक्षेत्रांचा इतिहास रंजक पद्धतीने मांडून लोकांच्या धार्मिक व आध्यात्मिक जिज्ञासेचे समाधान करणे, हे या टीमचे मुख्य काम असते..... आणखी वाचा
पुढील लेख
Adhikmaas Kamla Ekadashi 2026 परमा एकादशीला धन-संपत्ती आणि समृद्धीसाठी उपाय