गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By
Last Modified: सोमवार, 6 डिसेंबर 2021 (12:37 IST)

दत्त आरती - जयदेवी, जयदेवी, जय देववंदे

जयदेवी, जयदेवी, जय देववंदे । श्रीवेदवंदे श्रीअनसूये, माये, जय मंगळ वरदे ॥धृ.॥
जयजय श्रीचतुराननदेवात्मज कांते । जयजय कर्दमदुहिते, दत्तात्रय माते । येती तडि तापडि यति भवदाश्रमातें । पावति मुनिजन-खगमृगगण-विश्रामातें ॥जय.॥१॥
नाना गुल्मलताद्रुम-अमृतरसवल्ल्या । आनंदघन पदवैभव श्रीहरि कैवल्या । सुपुत्रवंत्या भार्गवि, देवकि, कौसल्या । वानिति अनसूये तव बहुविध कौशल्या ॥जय.॥२॥
देउनि भोजन सकळां सकळांच्या पाठीं । करसी भोजन स्वसुतासह एक्या ताटीं । अनंत ब्रह्मांडांचे घट ज्याचे पोटीं । तो प्रभु ढेंकर देउनि अन्नांगुल चाटी ॥जय.॥३॥
श्रीलक्ष्मी-पार्वति-सावित्रीसहभर्त्या । अखंड ऋद्धि-सिद्धि नांदति गिरिवरि त्या । चौसष्टअठरा करती त्वदगुणआवर्त्यां । विष्णु-दासाच्याही ऐकिसि पदार्त्या ॥जय.॥४॥