1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
  4. datta aarti lyrics in marathi

दत्त आरती - पंचारति ओंवाळूं ॥

दत्त आरती - पंचारति ओंवाळूं ॥ datta aarti lyrics in marathi
पंचारति ओंवाळूं ॥ नित्य सहज्जानंदें भजनीं खेळूं ॥धृ.॥
देह हें ताट करूनी ॥ मन बुद्धि शुद्ध निरांजनी ॥ भक्तीचें घृत घालुनी ॥ ज्ञानज्योति अखंड दीप पाजळूं ॥१॥
जीवशिवमाया खोटी । चिद्विलासीं भासे सहज त्रिपुटी ॥ मिथ्या ही द्वैतरहाटी ॥ सद्‌गुरु निज बोधें द्वैत हें जाळूं ॥२॥
नाहीं मुळीं अहंममता । बंधमोक्षाची ही कल्पित वार्ता । खूण ही बाणली दत्ता ॥ निजरंगीं रंगुगीं रंगुनी स्वरूपी मिळूं ॥३॥
(पंतमहाराज)
पुढील लेख
एकनाथांचे सहस्त्रभोजन