सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By
Last Modified: शनिवार, 11 डिसेंबर 2021 (10:15 IST)

दत्त आरती - सहज स्थितीची आरती दत्ता नित्य आम्ही करूं

सहज स्थितीची आरती दत्ता नित्य आम्ही करूं ॥ द्वैतवात ही जाळुनी सहज अव्दैतीं भरूं ॥धृ.॥
अनुभवताटीं स्वयंज्योती सहज ओवाळूं ॥ जीवन्मुक्ती भोगुनी सहज गुरुपदीं लोळूं ॥१॥
वासनात्रय खंडुनी समूळ निर्वांसन होऊं ॥ प्रारब्धास्तव देह धरूनी सद्‌गुरुगुण गाऊं ॥२॥
ब्रह्मानंद भोगुनी आम्ही देऊं जनासी । कैवल्या हें उघड दावूं दत्त प्रेमरसीं ॥३॥(पंतमहाराज)