1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
  4. Rishi Panchami Aarti Marathi Lyrics

Rishi Panchami Aarti Marathi Lyrics ऋषी पंचमी आरती मराठी

जय जय ऋषि राजा, प्रभु जय जय ऋषि राजा।
देव समाजे आदरिले मुनि, केले देवांचे कार्य राजा॥
 
जय दध्यंच, वर्णी भारद्वाज, गौतम।
जय शृंगी, पराशर, अगस्ती मुनि सत्तम॥
 
वसिष्ठ, विश्वामित्र, अंगिरा, अत्री जय जय।
कश्यप, भृगु अन् कृपाचार्य, तपसंचय॥
 
वेद मंत्र द्रष्टे तुम्ही, सर्वांचे भले केले।
सर्व जनतेला तुम्ही, वैदिक ज्ञान दिले॥
 
सर्व ब्राह्मण जनतेचे, मूळ पुरुष स्वामी।
ऋषि संतती आम्ही, व्हावे ज्ञानी सत्पथगामी॥
 
आमच्यात प्रभु आस्तिकता, लवकर तुम्ही भरा।
शिक्षित व्हावे सर्व नर, हा वर आम्हा द्या॥
 
धरणीधर कृत ऋषि जनांची, आरती जो गाईल।
त्या नरावर मुनि कृपेने, सुख संपत्ती येईल॥
पुढील लेख
Rishi Panchami 2026: १५ सप्टेंबर ऋषी पंचमी, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि व्रतकथा