शनिवार, 17 जानेवारी 2026
  1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By
Last Modified: मंगळवार, 25 मे 2021 (12:12 IST)

उग्र रूप तुझे हे भगवंता

The fierce
उग्र रूप तुझे हे भगवंता,
प्रकट जाहले ,द्याया शांती चित्ता,
गडगडले स्तम्भ, तिन्ही सांजेस,
थरारली धरणी, भयंकर तव आवेश,
गर्जना अवकाशी गर्जूनी गेली,
ना नर, ना पशु मूर्ती प्रकट झाली,
प्रल्हादा च्या भक्ती चे हे फळ ,
हिरण्यकश्यपू चा आलासे काळ,
करण्या निप्पात दुष्ट शक्तीचा निश्चित,
घेतले रुप आक्राळ विक्राळ,तू तेथ,
वरदानात अडकला होतास, म्हणूनच,
घ्यावे लागले "नृसिंह"स्वरूप तुजलाच,
द्यावा आशिष सर्व भक्तांसी प्रभू,
घ्यावा अवतार पुन्हा, उद्धारावी ही भु!
....अश्विनी थत्ते