शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By

श्री दत्त प्रभूची कांकड आरती

कांकडआरती श्रीदत्तप्रभूची
 
पंचप्राण काकड आरती तत्त्वात्मक ज्योती । लावुनि तत्त्वात्मक ज्योती ।
ओवाळिला श्री त्रयमूर्तिं परमात्मा प्रीती ॥ध्रु०॥
 
ओवाळूं आरती माझ्या सद्‌गुरुनाथा । स्वामी श्रीगुरुनाथा ।
शरण मी आलो तुज । शरण मी आलो तुज ।
श्री पदीं ठेवियला माथा ॥१॥
 
कृष्णा सुपंचगंगा अनादि संगमीं । राहे यतिवर तरुतळीं ।
तो हा माझा कुलस्वामी । ओवाळूं०॥२॥
 
द्वारीं चौघडा वाजे वाजंत्री वाजती । कर्णे वाजंत्री वाजती।
नाना घोषें गर्जत । नाना वाद्यें गर्जत ।
भक्त स्वानंदें स्तविती ॥ओवाळूं ॥३॥
 
इंद्रादि सुरवर पन्नग दर्शनास येती। श्रीचे दर्शनास येती ।
नारद मुनिवर किंन्नर तुंबर आळविती ॥ओवाळूं॥४॥
 
पाहुनि सिंहासनीं आदि मूर्ति सांवळी । चिन्मय मूर्ति सांवळी ।
श्रीगुरुभक्त तन्मय । श्रीगुरुभक्त निर्भय श्रीपदीं ओवाळी ॥ओवाळूं॥५॥