शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2018
Written By

मिथुन राशीच्या जातकांचे 2018 मधील वार्षिक राशिभविष्यफल

या वर्षात बहुतांशी ग्रह तुमच्या साथीला आहेत. पंचमस्थानामधला गुरू आणि सप्तमस्थानामधला शनी तुम्हाला विशेष फलदायी ठरतील. पहिले दोन महिने तुम्हाला तुमच्या शब्द काळजीपूर्वक वापरावे लागतील, कारण त्या शब्दांमुळे वाद उद्भवून तुम्हाला त्रास होऊ शकतो. ज्या कामात अडथळे आले होते ती कामे मार्गी लागल्यामुळे तुम्ही समाधानी दिसाल, पण या ग्रहस्थितीला मे महिन्यानंतर अष्टमात येणारा मंगळ गालबोट लावेल त्यामुळे आपली मर्यादा सोडू नका.
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....
धंदा, व्यवसाय व नोकरी....
तुमच्या कामाचा विस्तार वाढविण्यासाठी तुम्ही घरापासून लांब जाऊ शकता आणि तिथे तुम्ही चांगली आर्थिक प्राप्ती कराल. पण, तुम्ही तुमच्या आप्तेष्टांपासून लांब राहाल. त्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात समतोल राखणे गरजेचे असेल. 2018 या वर्षातील मिथुन राशीच्या राशी भविष्यानुसार मुले खोडकर असतील, पण ती नवीन गोष्टी शिकतील आणि त्यांच्या क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी करतील. या वर्षात व्यवसायातून अधिक लाभ होईल. तुम्ही पूर्वी केलेल्या मेहनतीचे फळ तुमच्या व्यावसायिक यशाचा पाया असेल. एकूण, विकास आणि प्रगती करण्यासाठी या वर्षात तुम्हाला अनेक संधी लाभतील. नवीन नोकरी असणार्‍यांनी कामामध्ये तत्पर राहणे आवश्यक आहे. ज्यांना नोकरी करून जोडधंदा करायचा असेल त्यांची मात्र बरीच धावपळ होईल. कामाचा ताण पेलवणार नाही. चांगल्या नोकरीकरता बदल करू इच्छिणार्‍यांना जानेवारी, फेब्रुवारी, जुलै, ऑगस्ट अनुकूल आहेत. मात्र नवीन नोकरी स्वीकारताना काम पेलवेल की नाही हे तपासून पाहावे.
पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान....
गृहसौख्य व आरोग्यमान... 
या वर्षी तुम्ही तुमच्या इच्छित जोडीदाराशी लग्नगाठ बांधू शकाल. या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये प्रमाणापेक्षा अधिक खर्च होईल. आरोग्याच्या कुरबुरी सुरू राहतील आणि हवेवाटे होणारे रोग, सांधेदुखी इत्यादीची लागण तुम्हाला होऊ शकेल. आंबट पदार्थ वर्ज्य करा. कौटुंबिक स्वास्थ्यात येत्या वर्षात बरेच चढउतार असतील. मार्चपूर्वीचा काळ शांततेत जाईल. एप्रिल ते ऑगस्टदरम्यान खर्च वाढतील. पण ते चांगल्या कारणाकरता असतील. जुलैनंतर नवीन जागेत प्रवेश होईल. तरुणांनाही स्थिरता लाभल्याने वैवाहिक जीवनात नवीन जागेत प्रवेश होईल. या वर्षात मुलांची प्रगती उत्तम होईल. पण त्याचा तुम्हाला प्रत्यक्ष उपयोग होणार नाही. येत्या वर्षात नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्याशी शक्यतो पैशाचे व्यवहार करू नका. अनपेक्षित कारणांकरिता मे हिन्यानंतर पैसे खर्च करावे लागतील. वृद्ध व्यक्तींनी स्वत:ची प्रकृती सांभाळली तरच त्यांना सर्व गोष्टींचा आनंद मिळू शकेल. कलाकार, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते यांना येत्या वर्षात प्रगती झाली तरी एक प्रकारचा दबाव राहील.