शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2018
Written By

हिंदू नव वर्षाचे भविष्यफल तुमच्या राशीनुसार

1. मेष राशी (चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ.)
या राशीचा स्वामी मंगळ नवीन वर्षाचा मंत्री आहे त्यामुळे हे कुठले ही निर्णय विचार करून घेणार नाही. प्रत्येक कार्यात तुम्हाला अडथळे येण्याची शक्यता आहे. तसेच पैशांची देखील तंगी राहणार आहे. अज्ञात भय आणि काळजी राहण्याची शक्यता आहे.  
 
2. वृषभ राशी (ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
वर्षाचा राजा शनी तुमच्या राशीच्या स्वामी शुक्राचा मित्र आहे आणि त्यावर दृष्टी ठेवतो. म्हणून हे वर्ष तुमच्यासाठी उत्तम राहण्याची शक्यता आहे. बर्‍याच वेळापासून अडकलेले कामं पूर्ण होतील. धन संबंधी कार्यांमध्ये लाभ मिळेल. 
 
3. मिथुन राशी (का, की, कू, घ, ङ, छ, के, को, ह) 
या राशीचा स्वामी बुध आहे. त्यामुळे नवीन वर्षात सर्व प्रकाराचे शुभ फळ तुम्हाला मिळणार असून परिस्थिती देखील अनुकूल राहण्याची शक्यता आहे. नुकसानापासून सावध राहा. धनलाभ होईल. नवीन जबाबदारी वाढेल.
 
पुढे पहा कर्क, सिंह आणि कन्या राशी ... 

4. कर्क राशी (ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो) 
वर्षाचा मंत्री मंगळ मित्र आहे. मंगळामुळे तुमचे कार्य सुरळीत होतील. या वर्षात सर्वात जास्त प्रबळ कर्क राशी राहणार आहे. अडकलेले कामं पूर्ण होतील. सर्व प्रकारांचे विवाद संपुष्टात येतील.  
 
5. सिंह राशी (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
मंगळ आणि सूर्य मित्र आहे. जुलैपासून गुरु या राशीत प्रवेश करणार आहे. म्हणून ही राशी मजबूत स्थितीत राहणार आहे. आर्थिक लाभ होईल. सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. शत्रूंवर विजय मिळवाल.  
 
6. कन्या राशी (ढो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो)
वर्षाचा राजा शनी आणि या राशीचा स्वामी बुध, दोघे आपसात मित्रभाव ठेवतात. कार्यांमध्ये येणारे अडथळे दूर होतील. धन लाभ होईल आणि विरोधी परास्त होतील.
 
पुढे पहा तूळ, वृश्चिक आणि धनू राशीचे भविष्यफल.... 

7. तुला राशी (रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, ते)
शनी आणि तुला राशीचे स्वामी शुक्र, दोघांचे मित्र आहे. यामुळे तुमच्या सर्व समस्या या वर्षी दूर होणार आहे. ज्या लोकांच्या लग्नात अडचणी येते होत्या त्या आता दूर होतील. नोकरीत बढती आणि व्यापारात लाभ होण्याची शक्यता आहे. न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळेल. 
 
8. वृश्चिक राशी (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू)
नवीन वर्षाचा मंत्री मंगळ या राशीचा स्वामी आहे. त्यामुळे तुमची राशी संपूर्ण वर्ष ताकतवार राहणार आहे. बरेच कार्य या वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे. या लोकांना वाद विवादाचा सामना करावा लागणार आहे पण त्यात तुम्हीच जिंकणार आहे.  
 
9. धनु राशी (ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे)
ही राशी या वर्षी सामान्याच राहणार आहे. आरोग्य संबंधी तक्रार होण्याची शक्यता आहे. आर्थिक प्रकरणात कमजोरी राहणार आहे. घर-परिवारात या लोकांची स्थिती कमजोर होऊ शकते. 
 
पुढे पहा मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांचे भविष्य... 

10. मकर राशी (भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी)
शनी या राशीचा स्वामी आहे. पण शनीची ही स्थिती मकर राशीसाठी लाभदायक ठरेल. गुंतवणूक लाभदायक ठरणार आहे. विरोधी हार मानतील. घरात आनंदाचे वातावरण राहणार आहे. 
 
11. कुंभ राशी (गू, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा)
या राशीचे स्वामी देखील शनी आहे. ही राशी संपूर्ण वर्षभर शक्तिशाली राहणार आहे. लाभ मिळेल. तुमच्या सर्व योजना यशस्वी ठरतील. तुम्ही ठेवलेले लक्ष्य पूर्ण होतील. जुन्या नुकसानाची भरपाई होईल.  
 
12. मीन राशी (दी, दू, थ, झ, ञ, दे, दो, चा, ची)
या वर्षी ही राशी सामान्य राहणार आहे. राशी स्वामी गुरुची दृष्टी आणि जुलैनंतर गुरुचे षष्ठम भावात येणे, सर्व प्रकारे शुभ ठरणार आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहणार आहे आणि करियरमध्ये लाभ मिळणार आहे.