सिंह राशीच्या जातकांचे 2018 मधील वार्षिक राशिभविष्यफल
सिंह राशीच्या जातकांना वर्षभर गुरू आणि शनी या मोठ्या दोन ग्रहांची चांगली साथ मिळणार आहे. त्यामुळे या वर्षांमध्ये दिवसेंदिवस तुमच्या इच्छा आकांक्षा वाढत राहतील. तुम्हाला धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात स्वारस्य निर्माण होईल आणि तुम्ही कदाचित तीर्थयात्रेसाठी जाऊ शकाल. ऑगस्टपर्यंत निर्वेध प्रगती होईल. त्यानंतर स्पर्धा किंवा इतर गोष्टींमुळे तुम्हाला थोडासा त्रास सहन करावा लागेल. तुमच्या स्वभावानुसार येत्या वर्षात तुम्हाला काहीतरी भव्यदिव्य करावेसे वाटेल. ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात तिथे आपली प्रतिमा उंचाविण्याचा प्रयत्न करा.
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....
धंदा, व्यवसाय व नोकरी....
तुमच्या कष्टांमुळे तुम्ही प्रगतिपथावर जाऊ लागाल. पण, तुम्ही आळशीपणा टाळला पाहिजे. तुम्ही आयुष्यात पुढे पुढे जात आहात आणि तुम्हाला अनुकूल घटना घडत आहेत आणि तुमची आर्थिक प्रगती होणार आहे, याची तुम्हाला प्रचिती येईल. गेल्या सहा आठ महिन्यात तुम्ही काही प्रकल्प हाती घेतला असेल तर त्यामध्ये आता गिर्हाईकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. व्यवसाय धंद्याच्या दृष्टीने तुम्ही प्रगतीतला एक महत्त्वाचा टप्पा गाठल्याचे समाधान लाभेल. सध्या चालू असलेल्या कामांना वेग येईल. परदेशप्रवासाची खूप शक्यता आहे. गरोदर महिलांनी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत विशेष काळजी घ्यावी. ऑक्टोबर महिन्याच्या मध्यानंतर कौटुंबिक आणि व्यावसायिक आयुष्यात सकारात्मक बदल झालेले दिसून येतील. तुम्हाला जनमानसातही स्थान लाभेल. नवीन नोकरीच्या दृष्टीने फेब्रुवारी, मार्च आणि ऑगस्ट, सप्टेंबर ते डिसेंबर या दरम्यान संधी लाभेल.
पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान....
गृहसौख्य व आरोग्यमान...
या वर्षात कौटुंबिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवता येतील. खास करून विवाहोत्सुक व्यक्तींना नवीन वर्ष कौटुंबिक जीवनात पदार्पण करण्यास उत्तम आहे. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत तुमच्या भावंडांच्या प्रकृतीच्या कुरबुरी सुरू राहतील, पण तुमचे धैर्य वाढलेले असेल. प्रेम प्रकरणात मिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. एका बाजूला तुमच्यात काही गैरसमज होतील तर दुसरीकडे तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून होणाऱ्या प्रेमाच्या वर्षावात तुम्ही न्हाऊन निघाल. वैवाहिक सुख वाढेल. मुलांना थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील आणि तुम्हाला त्यांची काळजी घ्यावी लागेल. त्याचप्रमाणे त्यांच्या प्रयत्नांमध्ये त्यांना पाठिंबा द्यावा लागेल. वृद्धांना लांबाचा प्रवास करून नातेवाइकांना भेटण्याचा योग संभवतो. राजकारण, कला, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना येत्या वर्षात उत्तम यश व प्रसिद्धी मिळेल. मुलांच्या प्रगतीविषयी मात्र थोडीशी चिंता जाणवेल. कुटुंबीयांसह देशात किंवा परदेशात प्रवास करण्याचे योग मार्चनंतर येतील.