Marathi Biodata Maker

कन्या राशीच्या जातकांचे 2018 मधील वार्षिक राशिभविष्यफल

Updated: शुक्रवार, 29 डिसेंबर 2017 (14:35 IST)
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....
धंदा, व्यवसाय व नोकरी.... 
या वर्षात तुम्ही अनेक ध्येय गाठणार आहात. विविध प्रकारच्या संधींच्या माध्यमातून तुम्हाला चांगले आर्थिक परिणाम पाहायला मिळतील. तुमचे सामाजिक वर्तुळ अत्यंत सक्रिय असेल आणि तुमचे समाजातील स्थानही उंचावेल. तुम्हाला व्यावसायिक आयुष्यात समाधान लाभेल. तुमच्या उपक्रमांना यश लाभेल. फार काळापासून असलेली इच्छा पूर्ण होईल. वर्षभर उत्पन्नाची आवक चांगली राहील. जानेवारी महिन्यात अनपेक्षित लाभ संभवतो. ऑक्टोबर महिन्यानंतर या वृद्धीमध्ये अजून भर पडेल. नोकरदार व्यक्तींना थोडेसे गैरसोयीचे वर्ष आहे. जास्त काम करून जास्त पैसे मिळविण्याची तुमची नेहमीच अभिलाषा असते. ती पूर्ण करण्याची तुमची जबरदस्त इच्छा या वर्षात जागृत होईल. पण त्याच्याकरता कदाचित तुम्हाला कौटुंबिक सुखात कमतरता सहन करावी लागेल.
पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान....
गृहसौख्य व आरोग्यमान...  
कामाच्या निमित्ताने किंवा व्यावसायिक निमित्ताने तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून काही काळ लांब राहावे लागेल. घरात एखादे पवित्र कार्य पार पडेल. घरात नवी भर पडण्याचीही शक्यता आहे. एकुणात, सर्व बाजूंनी हे वर्ष तुमच्यासाठी लाभकारक असेल. तुम्ही कौटुंबिक जीवनात शांतता राखणे आणि भांडण टाळणे आवश्यक आहे. तुम्ही मित्र आणि आप्तेष्टांसोबत चांगला काळ व्यतीत कराल. मुलांमध्ये एकाग्रतेची कमतरता जाणवेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या माध्यमातून लाभ होईल पण ऑक्टोबर महिन्यानंतर त्याच्यातील/तिच्यातील ऊर्जा कमी असेल किंवा आरोग्याच्या बाबतीत काही गुंतागुंत निर्माण होऊ शकते. पण तुम्हाला त्यांच्याकडून पूर्ण पाठिंबा मिळेल.तुम्हाला तुमच्या मुलांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे कारण आरोग्याच्या काही तक्रारी उद्भवू शकतात आणि त्यामुळे थोडा चिडचिडेपणा येऊ शकतो. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनाही दिव्यातून जावे लागेल. कला, क्रीडा, राजकारण इत्यादी क्षेत्रातील व्यक्तींनी प्रयत्नांवर जोर देणे आवश्यक राहील.

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments