गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2019
Written By
Last Modified: रविवार, 31 मार्च 2019 (13:21 IST)

साप्ताहिक राशीफल 31 मार्च ते 6 एप्रिल 2019

मेष : आठवड्याची सुरुवात नोकरी करणार्या  लोकांसाठी फारच उत्तम राहणार आहे. तुम्ही तुमच्या शत्रूंवर नक्की विजय मिळवणार आहे. त्यांचे सर्व डाव उलट पडणार आहे, म्हणून काळजी करण्यासारखे काहीच नाही. महिला जातकांशी तुमचे संबंध या आठवड्यात चांगले राहणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला फायदा ही मिळणार आहे. आठवड्याचे मधले दिवस तुमच्या दांपत्य जीवनासाठी अनुकूल आहे.  

वृषभ : या आठवड्यात तुम्हाला देश किंवा परदेशातील यात्रा घडू शकते. सर्व प्रकारच्या परीक्षेमध्ये मनोनुकूलरीत्या चांगले यश मिळेल. नवीन वाहन, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सुख सुविधांच्या वस्तू, म्युझिक सिस्टम इत्यादी वस्तूंचे खरेदीचे योग या आठवड्यात आहे. कौटुंबिक जीवन उत्तम असेल आणि घरातील मंडळी फारच आनंदात राहणार आहे. तुम्ही पण त्यांच्या आनंदात सहभागी व्हाल.  

मिथुन : या आठवड्याच्या सुरुवातीत प्रेम संबंधांसमवेत बर्याखच प्रकरणात दुरावा येण्याचे योग आहे. प्रेम संबंध व वैवाहिक बंधन समाप्त होण्याची शक्यता देखील आहे. या आठवड्यात तुमच्या जीवनात विपरीत लिंगी व्यक्तीचे प्रवेश होणार आहे, ज्याने तुमचे नवीन संबंध निर्माण होतील. जमीन, घर व स्थावर मालमत्ता खरेदी करताना जास्त गोंधळून जाऊ नका. या आठवड्यात तुम्हाला परदेश किंवा एखाद्या दूर जागेवर जाण्याचा योग आहे.  

कर्क : नेहमी विचार करून पुढे जाण्याच्या स्वभावामुळे तुम्हाला या आठवड्यात आर्थिक लाभ मिळणार आहे. तुम्ही प्रत्येक कार्यात सावधगिरी बाळगून पुढे चालाल. धोका असणार्या कार्यांपासून दूर राहणे योग्य आहे. या वेळेस तुमचा आर्थिक पक्ष मजबूत राहणार आहे. जमीन घरासाठी करण्यात आलेले गुंतवणूक तुम्हाला या आठवड्यात उत्तम लाभ देणार आहे.  

सिंह : प्रेम प्रकरणात तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागणार असून वाणीवर संयम ठेवणे गरजेचे आहे अन्यथा मतभेद होण्याची शक्यता आहे. नोकरी करणार्या  लोकांसाठी हा काळ फारच उत्तम असून त्यांना प्रमोशन मिळून वेतनवाढ होण्याची शक्यता आहे. 4 व 6च्या दरम्यान कौटुंबिकजीवनात लहान सहानं खटपटी होण्याची शक्यता आहे. पण तुम्हाला तुमच्या साथीदारासोबत विनम्र वागण्याचा सल्ला देण्यात आला आहे.  

कन्या : शक्य असल्यास या काळात महत्त्वपूर्ण बाबतीत चर्चा करणे टाळावे. एखाद्या सकारात्मक कारणांमुळे मुळे तुम्ही कुटुंबाशी वेगळे होऊ शकता. जे लोकं परदेशात जाण्याच्या प्रयत्न करत आहे, त्यांना या आठवड्यात नक्कीच यश मिळण्याची शक्यता आहे. पासपोर्ट, विजासंबंधित बाबींना गती मिळणार आहे. विदेशात नोकरीचा शोध घेत असलेल्या लोकांना संधी मिळेल.  

तूळ : तसं तर हा आठवडा मागील आठवड्यासारखा एवढा उत्तम नसून सामान्य राहणार आहे. तुमच्याजवळ उत्पन्नाचे सीमित साधन राहणार आहे. पण, आकस्मिक खर्च जास्त असल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती कमजोर होईल, म्हणून सावध राहणे गरजेचे आहे. तुम्हाला आजारपणावर धन खर्च करावे लागणार आहे. जोडीदाराचे आरोग्य तुम्हाला या आठवड्यात अस्वस्थ करून देईल.

वृश्चिक : जोडीदारासोबत तुमचे संबंध उत्तम असून तुम्ही त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण घालवाल. 5 आणि 6 तारीख तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहणार आहे. तुम्हाला आर्थिक बाबतीत मदत मिळणार आहे. तुम्ही या आठवड्यात तुमच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नवीन स्रोत उभे करण्यात सक्षम व्हाल.

धनू : व्यवसायी जातक त्यांच्या व्यवसायाला पुढे येण्याचा प्रयत्न करतील. घर, वाहन व इतर सुख सुविधांच्या वस्तूंवर तुम्ही या आठवड्यात धन खर्च कराल. महिला जातक सौंदर्यप्रसाधनांवर व दागिन्यांची खरेदी करतील. घरात आनंदाचे वातावरण असेल. तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात प्रसन्नता अनुभवाल. पण तुम्हाला या आठवड्यात तुमच्या आरोग्यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

मकर : तुम्ही या आठवड्यात तुमच्या शरीराची मेडिकल तपासणी नक्की करून घ्या. जर चेकअपमध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास दिसून आला तर लगेचच त्याचा इलाज सुरू करणे गरजेचे आहे. त्याशिवाय काही जातकांना शरीरातील खालील भागात काही समस्या उद्भवण्याची शक्यता आहे जसे पाईल्स, गुप्तांगतत्रास, पायांवर सूज येणे इत्यादी.

कुंभ : या आठवड्यात तुम्ही तुमच्या बुद्धी आणि कौशल्याच्या दमावर तुमच्या व्यवसायाला यशाची पायरी नक्कीच दाखवणार आहे. यश दृष्टिक्षेपात राहू शकेल. सर्व प्रकारच्या परीक्षेमध्ये चांगले यश मिळेल. आर्थिक आवक समाधानकारक राहून आर्थिक टंचाईचा सामना सहसा करावा लागणार नाही व यश समोर दिसू लागेल. या आठवड्यात तुम्हाला नातेवाईक, मित्र, पारिवारिक सदस्य व इतर ओळखींच्या लोकांची मदत मिळणार आहे.

मीन : जमीन, घर व स्थावर मालमत्तेत तुम्ही गुंतवणूक करू शकता कारण गणेशजींप्रमाणे ग्रहांची स्थिती तुमच्या अनुकूल आहे. जे जातक स्वत:च्या घराची खरेदीचे मन बनवत आहे, त्यांना नक्कीच यश मिळणार आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्याअगोदर पूर्णपणे विचार करून पुढे जा आणि कमी वेळात धन मिळवण्याचा विचार करून गुंतवणूक करू नका अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे.