शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2019
Written By
Last Modified: शनिवार, 19 ऑक्टोबर 2019 (11:49 IST)

साप्ताहिक राशीफल 20 ते 26 ऑक्टोबर 2019

मेष :  तुमच्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फारच अनुकूल आहे. संपूर्ण आठवडा धन येत राहणार आहे. व्यवसायी व नोकरी करणार्‍या लोकांना स्वत:चे कार्य संपादनासाठी भरपूर संधी मिळण्याची शक्यता आहे. जमीन, घर व स्थायी मालमत्तेशी निगडित कार्यांमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. जर तुमची एखाद्या व्यवहाराची बोलणी सुरू असेल तर त्यात तुम्हाला सकारात्मक फळ मिळण्याची शक्यता आहे. व्याज किंवा उधार दिलेले पैसे परत मिळण्याची उमेद आहे. तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून आर्थिक मदत मिळू शकते. तुम्ही मानसिकरूपेण शांत अनुभवाल. समाजात तुमची मान प्रतिष्ठा वाढेल. ऐकून हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे. पती पुत्राचे नाते अधिक घट्ट होईल. या आठवड्यात बर्‍याच बाबतीत चर्चा होऊ शकते. जातकांमध्ये आईच्या प्रती मान सन्मान वाढेल. जर तुम्ही आईपासून दूर राहत असाल तर या आठवड्यात तुमची तिच्याशी नक्कीच भेट होणार आहे.
 
वृषभ : या आठवड्यात तुम्हाला दूरच्या पल्ल्याचा प्रवास करावा लागणार आहे किंवा मनोरंजनावर जास्त वेळ घालवाल. लग्न समारंभ किंवा सामाजिक प्रसंगांमध्ये जाण्याचा योग आहे. मित्र किंवा परिचितांसोबत तुम्ही फिरायला जाऊ शकता. त्यामुळे तुमचे मन आनंदाने भरून जाईल. प्रवासादरम्यान लहान सहानं अडचणींचा सामना करावा लागणार आहे. सरकारी किंवा प्रायव्हेट नोकरी करणार्‍या लोकांची बदली होण्याची शक्यता आहे. त्यासाठी स्वतःला तयार ठेवा. या आठवड्यात तुमचे बढतीचे योग देखील आहे. विद्यार्थी वर्गासाठी वेळ अनुकूल नसल्यामुळे त्यांना चांगल्या परिणामासाठी फार मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यांच्या अभ्यासात पारिवारिक समारंभ व इतर प्रकाराचे कार्य अडचण घालू शकतात. भाऊ बहीण किंवा मावशीपक्षासोबत तुमचे संबंध अधिक घट्ट होतील. मित्र आणि बिजनस पार्टनरांकडून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.
 
मिथुन : हा आठवडा तुमच्यासाठी आर्थिक बाबतीत उत्तम राहणार आहे पण आरोग्याच्या बाबतीत थोडे चढ उतार लक्षात येईल. व्यवसायी व नोकरी करणार्‍या लोकांना पैसा कमावण्याची बरीच संधी मिळणार आहे. स्वतंत्र कार्य करणार्‍या लोकांना लहान सहानं कार्य मिळत राहणार आहे. 20 व 21 तारखेला शासकीय कामात न्यायालयीन अडथळा येण्याची शक्यता आहे. पण घाबरण्यासारखे असे काहीच नाही, कारण प्रत्येक समस्यांचे निराकरण होणे शक्य आहे. तुम्हाला कुठल्या एखाद्या  न्यायालयीन नोटिसचे उत्तम द्यावे लागणार आहे. तुमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार होऊ शकते. तुमच्या जोडीदाराचे आरोग्यात बिघाड झाल्यामुळे तुम्ही अस्वस्थ्य व्हाल. जर तुमच्या कुटुंबात एखाद्या बाबीवर विवाद सुरू असेल तर या आठवड्यात त्याचे निराकरण होऊ शकतो. आपल्या संबंधांमध्ये मतभेद होऊ देऊ नका. आठवड्याच्या शेवटी तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे. पारिवारिक मालमत्तेशी निगडित प्रकरण संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
 
कर्क : या आठवड्याच्या सुरुवातीत तुम्ही स्वास्थ्य आणि आर्थिक पक्षामुळे काळजीत पडाल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या व्यवसायाकडे जास्त लक्ष देऊ शकणार नाही. तुमचे विश्वासपात्र अधिकारी आणि कर्मचारी तुमच्या गैर हजेरीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. गणेशजींचा सल्ला आहे की तुम्हाला या आठवड्यात आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. कुठल्याही प्रकारच्या शारीरिक तक्रारीचे लगेचच आरोग्य चाचणी करून त्याचे समाधान करावे. या वेळेस लहान सहानं ऑपरेशन होण्याची शक्यता आहे. 20, 21 आणि 22च्या दरम्यान तुमच्या भाग्य स्थानापासून उच्चाचा शुक्र पारगमन करणार असून त्यावर गुरुची दृष्टी पडेल, जी शुभ फल देणारी आहे. तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवण्याचे उत्तम योग मिळणार आहे. जर तुम्ही लोकांना रुपये उसने दिले असतील तर त्याची लवकरच परतफेड होण्याची शक्यता आहे. तुमच्या जीवनात सद्भाव आणि शांतीचा प्रसार होईल. या काळात तुम्हाला न्यायालयीन खटल्यात धन खर्च करावा लागणार आहे.
 
सिंह : या आठवड्याच्या सुरुवातीत पारिवारिक वातावरण आनंदाचे ठेवणे तुमच्यासाठी फारच गरजेचे आहे. त्याशिवाय प्रत्येक बाबतीत समजुतदारी आणि समाधानाचे धोरण ठेवावे लागणार आहे. तुम्हाला तुमच्या वाणीत विनम्रता आणि स्पष्टता आणावे लागणार आहे अन्यथा संबंधांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात आईच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच, स्वतः:च्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. तुमच्या उजव्या डोळ्या किंवा कानाचा त्रास होऊ शकतो. या आठवड्यात तुम्हाला शोक संदेश मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुमचे विरोधी सक्रिय राहणार असून प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला अपयशी करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण कार्याच्या प्रती तुमचे समर्पण भाव तुम्हाला यशस्वी करेल. उच्च अधिकार्‍यांसोबत तुमचे संबंध सुधारतील. तुम्ही तुमची जुनी मालमत्ता विकण्याचा विचार करू शकता. व्यवसायामध्ये भागीदारावर अंधविश्वास ठेवू नये. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागणार नाही. त्यांना अधिक प्रयत्न करावे लागणार आहे. गणेशींचा सल्ला आहे की तुम्ही इतर उपक्रमात अधिक लक्ष घालू नका.
 
कन्या : आर्थिक बाबतीत हा आठवडा थोडा निराशाजनक राहणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीत आर्थिक प्रकरणात काळजी राहील. आरोग्याच्या बाबतीत संबंधी संपूर्ण आठवडा उत्तम राहणार आहे. 18, 19 आणि 20 तारखेला आर्थिक स्थिती कमजोर राहणार आहे. पण हळू हळू त्यात सुधारणा येईल. तुम्ही तुमचा व्यवसाय बदल करण्याचा मन बनवू शकता. त्याशिवाय तुम्ही तुमच्या व्यवसायाला विस्तृत करण्यासाठी नवीन उप कार्यालय किंवा स्टोअर उघडू शकता. बायको किंवा मुलीच्या नावावर एखाद्या नवीन व्यवसायात गुंतवणूक केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जे लोक विवाह करण्यास उत्सुक आहे त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे. या आठवड्यात तुमची भेट एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी होण्याची शक्यता आहे, आणि ही भेट तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. ज्या लोकांना परदेशात जायचे आहे त्यांना नक्कीच या आठवड्यात यश मिळेल. पार्टनरशिप असलेल्या व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. भागीदारीत नवीन व्यवसाय सुरू करण्याचा योग जुळून येत आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा आठवडा अनुकूल आहे. तुम्ही एखाद्या विषय विशेषज्ञाशी मदत घेऊ शकता.
 
तूळ : या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी थोडी निराशाजनक राहण्याची शक्यता आहे. पारिवारिक वातावरणात तणाव, शारीरिक तंदुरस्तीची काळजी, कर्ज फेडण्यासाठी दबाव, विरोधी सक्रिय होतील, नोकरीत बदली इत्यादी कारणांमुळे मन व्याकुल होईल. आठवड्याच्या शेवटी तुमच्या स्थितीत थोडी फार सुधारणा येईल. जमीन, घर व स्थायी मालमत्ता विक्री केल्यामुळे धन लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे फारच आवश्यक आहे. वाहन चालवताना बेपर्वाई करू नका, नाहीतर अपघात होण्याची शक्यतेला नाकारता येत नाही. या आठवड्यात खर्च अधिक होण्याची शक्यता आहे. म्हणून गणेशजींचा सल्ला आहे की तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा अन्यथा तुम्हाला गरज पूर्ण करण्यासाठी रुपये उसने घ्यावे लागणार आहे. कौटुंबिक बाबतीत विनम्रतेची वागणूक करून त्याचे समाधान काढा. या आठवड्यात कोणालाही अपशब्द बोलू नका पण स्पष्ट बोला अन्यथा तुमच्या बोलण्यामुळे समोरच्या व्यक्तीत गैरसमज निर्माण होऊ शकतो याची काळजी घ्या. 
 
वृश्चिक : आठवड्याच्या सुरुवातीत भाग्याचा साथ मिळणार आहे आणि तुम्ही प्रत्येक क्षेत्रात विकास कराल. तुमच्या सर्व आशा अपेक्षा पूर्ण होण्याचा हा आठवडा आहे. संपूर्ण आठवडा धन मिळाल्यामुळे तुम्ही प्रसन्न राहाल. या वेळेस तुमच्या हातात जेवढे ही काम असतील ते पूर्ण होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यास यशस्वी ठराल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळवाल. लोन घेतल्यास ते पास होईल किंवा उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही भविष्यासाठी गुंतवणूक करू शकता. उद्योग असलेल्या जातकांना चांगला फायदा मिळणार आहे. तुम्ही नवीन मशीनरी किंवा जागा विकत घेऊ शकता. तुम्हाला व्यापार विस्तारणीसाठी कौटुंबिक सदस्यांची मदत मिळेल, खास करून पुत्रांची. हा आठवडा तुमच्यासाठी फारच लाभदायक ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या व्यापारासाठी एक नवीन विश्वासू भागीदार मिळण्याची शक्यता आहे. तसं तर 20 आणि 21 तारखेला आकस्मिक खर्च झाल्याने तुम्ही थोडे काळजीत याल.
 
धनू : आठवड्याच्या सुरुवातीत तुम्हाला आर्थिक लाभ झाल्याने तुम्ही आनंद अनुभवाल. या वेळेस तुम्हाला आधी केलेल्या गुंतवणुकीमुळे फायदा मिळू शकतो किंवा जर कोणाला पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे, खास करून ते धन जे मिळण्याची उमेद तुम्ही पूर्णपणे सोडली असेल. या काळात लांबणीवर गेलेले बरेच काम पूर्ण होतील आणि काही बाबींचे समाधान निघू शकतात. तुम्ही तुमच्या विरोधींमुळे जमीन, घर किंवा स्थायी मालमत्तेच्या प्रकरणात एखाद्या न्यायालयीन खटल्यात अडकू शकता. त्यासाठी खर्चाचा बंदोबस्त आधीपासूनच करून ठेवायला पाहिजे. व्यक्तिगत आणि  व्यावसायिक उद्देश्यासाठी नवीन वाहन खरेदीचे योग तयार होत आहे. घरात वस्त्र दागिने, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, सुख सुविधा इत्यादी साधनांची खरेदी करू शकता. तुम्ही या आठवड्यात कुटुंबासोबत एखाद्या रमणीय स्थळावर फिरायला जाऊ शकता. गुप्त धन किंवा पारिवारिक संपत्तीशी निगडित असलेले विवाद लवकरच संपुष्टात येऊ शकतात. भाऊ बहिणींच्या संबंधांत सुधार होण्याची शक्यता आहे. जर तुमच्यात जुना वाद सुरू असेल तर त्याचे या आठवड्यात नक्कीच समाधान निघेल.
 
मकर : या आठवड्याची सुरुवात आर्थिक बाबींसाठी फारच महत्त्वपूर्ण आहे. या आठवड्यात तुमच्या उत्पन्नाचे बरेच स्रोत राहणार आहे, पण अनायस होणार्‍या खर्चांची शक्यता आपण नाकारू शकत नाही. या आठवड्यात तुमचा समाजात मान सन्मान वाढेल. कौटुंबात देखील तुम्हाला महत्त्व मिळेल. सरकारी अधिकारी आणि उच्चाधिकार्‍यांसोबत होणारी भेट तुम्हाला येणार्‍या भविष्यात चांगली फलदायी ठरणार आहे. प्रोफेशनल क्षेत्रात तुमचे संबंध उत्तम राहणार आहे. 20 आणि 21 तारीखे दरम्यान शेयर बाजार, कमिशन आणि ब्रोकर सारख्या कार्यांमध्ये तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात कुठल्याही प्रकारचा दु:साहस करू नका. जे लोक जोडीदारीच्या शोधात आहे त्यांना या आठवड्यात नक्कीच यश मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. जमीन, घर आणि स्थायी मालमत्तेत समजदारीने केलेले गुंतवणूक चांगला लाभ देणारे ठरणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ फारच अनुकूल आहे आणि अभ्यासाकडे मुलांचा कल वाढणार आहे.
 
कुंभ : या आठवड्याच्या सुरुवातीत तुम्हाला बचतीवर जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. म्हणून गणेशजींचा सल्ला आहे की तुम्हाला या आठवड्यात व्यर्थ खर्चांवर अंकुश लावणे गरजेचे आहे. जर तुम्ही यात अपयशी ठरल्यास तर तुमचे महत्त्वाचे काम धना अभावामुळे बिघडू शकतात. व्यवसायात गुंतवणूक मुळे तुमचा हात तंग राहू शकतो. बँक लोनचा हफ्ता आणि व्याज हे तुमच्या चिंतेचा विषय ठरणार आहे. 19 आणि 20 तारखेच्या दरम्यान तुम्हाला थोडा धीर मिळेल. करियरसंदर्भातील नवी संधी मिळण्याची शक्यता. त्यामुळे घरांत उत्साहाचे वातावरण होईल. तुम्हाला तुमच्या ओळखीच्या लोकांकडून मदत मिळणार आहे पण ती तुमच्या गरजेपेक्षा फारच कमी राहणार आहे. कुटुंबीयांशी निगडित बाबींमध्ये सध्या समाधान होण्याची शक्यता फारच कमी आहे. काही प्रकरणांमुळे तुम्हालान्यायालयीन खटल्यात अडकण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या प्रकृतीमुळे तुम्ही काळजीत असाल. जर तुम्ही अस्वस्थ जाणवाल तर त्वरित डॉक्टरांना भेटा आणि स्वतः:ची मेडिकल चाचणी करा. डोळ्यांशी संबंधित आजार होण्याची शक्यता आहे. 
 
मीन : या आठवड्यात तुम्हाला मानसिक सुख आणि दुःख दोघांचा अनुभव होणार आहे. व्यक्तिगत आणि व्यावसायिक गरजेना पूर्ण करण्यासाठी तुम्ही नवीन वस्तूची खरेदी करण्याचे मन बनवाल. पण तुम्ही त्याचे आनंद घेण्यास चुकाल. व्यवसायात तुम्हाला सरकारी कारणांमुळे काही अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. तुम्ही मानसिक रूपेण अस्वस्थ व्हाल. काही महत्त्वपूर्ण निर्णय घेताना तुमचे तुमच्या भागीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. भौतिक सुख सुविधेत वाढ होईल, पण तुम्ही मानसिक व्याकुलतेमुळे त्याचा आनंद घेण्यास मुकणार आहात. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अनुकूल आहे. तुम्हाला शैक्षणिक यशामुळे शाळा, कॉलेज किंवा समाजात सन्मान मिळण्याची शक्यता आहे. सर्वश्रेष्ठ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पुरस्कार म्हणून मिळणार आहेत. जोडीदाराचे आरोग्य काळजीचा विषय बनेल. तुम्ही तुमच्या व्यवसायात या आठवड्यात उत्तम कामगिरी करणार आहात. आणि त्याचे तुम्ही गुंतवणूक कराल. नोकरी करणार्‍या लोकांसाठी हाआठवडा फारच उत्तम जाणार आहे. तुम्हाला या आठवड्यात लक्ष्य प्राप्तीसाठी कडक मेहनत घ्यावी लागणार आहे.