शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

Pushya Nakshatra महत्त्व, शुभ असण्याचं कारण जाणून घ्या

हिंदू कालावधी गणनेचा आधार नक्षत्र, सूर्य आणि चंद्राच्या गतीवर आधारित आहे. या सर्वात नक्षत्रांचे सर्वात महत्त्वपूर्ण स्थान आहे. तार्यांचा गटाला नक्षत्र म्हणतात. आमच्या आकाशात किंवा अंतराळात 27 नक्षत्र दिसतात. ज्या प्रकारे सूर्य मेष हून निघून मीन पर्यंत भ्रमण करतो त्याच प्रकारे चंद्र अश्विनीहून रेवती पर्यंतच्या नक्षत्रात विचरण करतो आणि तो काळ नक्षत्र मास म्हणून ओळखला जातो. हा काळ जवळपास 27 दिवसांचा असतो आणि या म्हणूनच 27 दिवसांचा एक नक्षत्र मास मानला जातो.
 
नक्षत्र मासाचे नाव-
1. आश्विन, 2. भरणी, 3. कृत्तिका, 4. रोहिणी, 5. मृगशिरा, 6. आर्द्रा 7. पुनर्वसू, 8. पुष्य, 9. आश्लेषा, 10. मघा, 11. पूर्वा फाल्गुनी, 12. उत्तरा फाल्गुनी, 13. हस्त, 14. चित्रा, 15. स्वाती, 16. विशाखा, 17. अनुराधा, 18. ज्येष्ठा, 19. मूल, 20. पूर्वाषाढ़ा, 21. उत्तराषाढ़ा, 22. श्रवण, 23. धनिष्ठा, 24. शतभिषा, 25. पूर्वा भाद्रपद, 26. उत्तरा भाद्रपद आणि 27. रेवती
 
पुष्य नक्षत्राचं महत्त्व-
1. पुष्य नक्षत्राचं शाब्दिक अर्थ आहे पोषण करणे किंवा पोषण करणारा. याचे एक आणखी नाव तिष्य नक्षत्र. काही ज्योतिष पुष्य शब्दाला पुष्प शब्दाचा उद्गम समजतात. पुष्प हा शब्द स्वत:मध्ये सौंदर्य, शुभता आणि प्रसन्नतेशी जुळलेला आहे. वैदिक ज्योतिषानुसार गायीचे कास पुष्य नक्षत्राचे प्रतीक चिन्ह मानले जातात. याला 'ज्योतिष आणि अमरेज्य' देखील म्हणतात. अमरेज्य शब्दाचा अर्थ आहे- देवतांचा पूज्य.
 
2. बृहस्पतीला पुष्य नक्षत्राच्या स्वामी देवताच्या रूपात मानलं जातं. बृहस्पती देवतांचे गुरु आहे आणि दुसरीकडे शनी ग्रह पुष्य नक्षत्राचे अधिपती ग्रह मानले गेले आहे म्हणून शनीचा प्रभाव शनी ग्रहाचे काही विशेष गुण या नक्षत्राला प्रदान करतात. तथापि बृहस्पती शुभता, बुद्धिमत्ता आणि ज्ञान याचे प्रतीक आहे आणि शनी कायमस्वरूपी, म्हणून या दोघांचे योग मिळून पुष्य नक्षत्राला शुभ आणि चिर स्थायी बनवतात.
 
3. पुष्य नक्षत्राचे सर्व चारी चरण कर्क राशीमध्ये स्थित असतात ज्यामुळे हा नक्षत्र कर्क राशी आणि त्याचे स्वामी ग्रह चंद्राच्या प्रभावात असतो. चंद्राला वैदिक ज्योतिष्यामध्ये मातृत्व आणि पोषणाशी निगडित ग्रह मानले गेले आहे. शनी, बृहस्पती आणि चंद्राचा या नक्षत्रावर मिश्रित प्रभाव या नक्षत्राला पोषक, सेवा भावाने काम करणारा, सहनशील, मातृत्व गुणांनी भरपूर आणि दयाळू बनवते ज्यामुळे या नक्षत्राच्या प्रभावात येणार्‍या जातकांमध्ये देखील हे गुण बघायला मिळतात. पुष्य नक्षत्राच्या चार चरणाहून प्रथम स्वामी सूर्य, दुसर्‍याचा स्वामी बुध, तिसर्‍याचा स्वामी शुक्र आणि चौथ्याचा स्वामी मंगळ आहे.
 
4. वैदिक ज्योतिषानुसार पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा असल्याचे सांगितले गेले आहे. पुष्याला एक पुरुष नक्षत्र मानले गेले आहे ज्या कारणामुळे अनेक वैदिक ज्योतिष या नक्षत्रावर बृहस्पतीचा मजबूत प्रभाव असल्याचं समजतात. पुष्य नक्षत्राला क्षत्रिय वर्ण प्रदान केलं गेलं आहे आणि या नक्षत्राला पाच घटकांपैकी, पाणी या घटकाशी जोडले गेले आहे.