शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

आपल्या घरात असतील ही झाडे तर लगेच बाहेर करा

घरात ज्योतिष आणि वास्तूनुसार योग्य झाडं लावल्याने प्रत्येक प्रकाराची समस्या दूर होते परंतू घरात नकारात्मक ऊर्जा पसरवणारे झाडं असल्यास घरातील वातावरणात ताण उत्पन्न होतं. जाणून घ्या असे कोणते झाडं आहेत ते...
 
1. काटेरी झाडं- घरात कधीही काटेरी झाडं लावू नये जसे कॅक्टस, गुलाब, आणि इतर...
 
2. पांढरं द्रव्य निघणारे झाडं- असे झाडं लावू नये ज्यातून पांढरं द्रव्य निघत असेल जसे आकड्याचं झाडं.
 
3. बॉन्सायी झाडं- अलीकडे बॉन्सायी झाडं लावण्याची फॅशन वाढली आहे. बॉन्सायी अर्थात कोणत्याही झाडच लहान रूप. याला वाढण्यापासून रोखलं जातं जे वास्तूच्या हिशोबाने योग्य नाही.
 
4. कोमेजलेले झाडं- वाळलेले, तुटलेले, कोमेजून गेलेले झाडं घरातून बाहेर करावे.
 
5. खोटे झाडं- घरात प्लास्टिक किंवा इतर पदार्थांनी तयार खोटे शोचे झाडं ठेवू नये. हे विवेकी अर्थाने अशुभ मानले गेले आहे. हे ऊन आणि गंधाला अधिक आकर्षित करतात.
 
काही फळझाडे असे आहेत ज्यांना घरी लावण्यास मनाही आहे. तसे तर अश्या झाडांची संख्या कमीच आहे तरी घरात मोठे झाडं लावण्यापूर्वी वास्तू विशेषज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. या व्यतिरिक्त बाभूळ, चिंच, कापसाचे झाडं देखील मोठे वृक्ष होतात म्हणून हे झाडं घरात लावू नये. आणि यांचे बॉन्सायी करण्याचा विचार देखील करणे अयोग्यच ठरेल कारण वास्तूप्रमाणे बॉन्सायी झाडं लावणे योग्य नाही.